Maharashtra Vidhan Sabha 2019 : ...तर निवडणुकीतून माघार घेऊ : राजेश क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 16:28 IST2019-10-03T16:27:02+5:302019-10-03T16:28:53+5:30
मी केलेल्या कामापैकी दहा टक्के जरी कोणी काम केलेला उमेदवार माझ्या विरोधात असेल तर आपण निवडणुकीतून माघार घेऊ, असे आव्हान शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी दुपारी पेटाळा मैदानावर झालेल्या सभेत दिले. क्षीरसागर यांनी गुरुवारी दुपारी कोल्हापूर उत्तरमधून शिवसेनेतर्फे आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले.

Maharashtra Vidhan Sabha 2019 : ...तर निवडणुकीतून माघार घेऊ : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : मी केलेल्या कामापैकी दहा टक्के जरी कोणी काम केलेला उमेदवार माझ्या विरोधात असेल तर आपण निवडणुकीतून माघार घेऊ, असे आव्हान शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी दुपारी पेटाळा मैदानावर झालेल्या सभेत दिले.
आमदार क्षीरसागर यांनी गुरुवारी दुपारी कोल्हापूर उत्तरमधून शिवसेनेतर्फे आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यांनतर पेटाळा मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव, रविकिरण इंगवले, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणुकी आधीच भरले नामनिर्देशनपत्र
आमदार राजेश क्षीरसागर यांनी खासदार संजय मंडलिक, देवस्थान अध्यक्ष महेश जाधव, रविकिरण इंगवले, माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्या सोबत जाऊन करवीर प्रांताधिकारी क्षीरसागर यांच्याकडे आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यांच्या पत्नी वैशाली क्षीरसागर यांनीही डमी म्हणून नामनिर्देशन पत्र भरले.
नामनिर्देशनपत्र भरुन आल्यानंतर आ. क्षीरसागर यांनी पेटाळा येथून मोठी मिरवणुक काढली, त्यामध्ये माजी महापौर विलासराव सासने, मारुतराव कातवरे, नंदकुमार वळंजू, माजी उपमहापौर उदय पोवार, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, नागेश घोरपडे, बाबा महाडिक, किशोर घाडगे सहभागी झाले होते.