‘बोटावरची शाई दाखवा, सोने-चांदी, दाबेलीवर सवलत मिळवा, कोल्हापुरातील व्यावसायिकांचा पुढाकार
By संदीप आडनाईक | Updated: November 20, 2024 17:28 IST2024-11-20T17:28:02+5:302024-11-20T17:28:42+5:30
संदीप आडनाईक कोल्हापूर : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. त्यांना हातभार लावण्यासाठी मतदान प्रक्रियेत ...

‘बोटावरची शाई दाखवा, सोने-चांदी, दाबेलीवर सवलत मिळवा, कोल्हापुरातील व्यावसायिकांचा पुढाकार
संदीप आडनाईक
कोल्हापूर : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करत आहे. त्यांना हातभार लावण्यासाठी मतदान प्रक्रियेत अधिक मतदारांनी सहभागी व्हावे यासाठी शहरातील अनेक व्यावसायिक आणि विक्रेते यांनीही पुढाकार घेतला आहे.
मतदानासाठी विविध सवलती देणाऱ्या व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वीप टीमचे सहायक नोडल अधिकारी नीलकंठ करे, वर्षा परीट यांच्या प्रयत्नांतून अनेक व्यावसायिक पुढे येत आहेत. खाद्यपदार्थ, दागिने यांवर २० टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर करण्यात आली आहे. एका व्यावसायिकाने तर केस कापल्यानंतर सवलत दिली आहे. ‘शाईचे बोट दाखवा आणि सवलत मिळवा’ अशा आशयाचे थेट आवाहन या व्यावसायिकांनी मतदारांना केले आहे.
मतदान केल्यानंतर जो बोटावरची शाई दाखवील त्याला सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर २० नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत २० टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे. - नंदू बेलवलकर, अध्यक्ष, कोल्हापूर सुवर्ण कारागीर सेवा संस्था.
मतदान केल्याचा पुरावा दाखवल्यास मतदाराला २० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत दागिन्यांच्या मजुरीवर २० टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे. - नचिकेत भुर्के, अध्यक्ष, सोने-चांदी कारागीर बहूद्देशीय असोसिएशन, कोल्हापूर
मतदान करून येणाऱ्या पहिल्या २०१ मतदारांना १ दाबेली किंवा १ हॉट कॉफी फ्री, त्यानंतर येणाऱ्यांना सर्व ऑर्डरवर २० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. - राजेंद्रकुमार सुतार, हरभोले कॅफे, अमरनाथ हाईट, हॉकी स्टेडियम रोड आणि एम्पायर टॉवर, पितळी गणपतीजवळ, ताराबाई पार्क.
बोटावरची शाई दाखवतील अशा सर्व मतदारांना सर्व सेवांवर २० टक्के सवलत देण्यात येईल. - सयाजी झुंजार, सयाजी हेअर ॲंड ब्युटी कन्सेप्टस, दाभोळकर कॉर्नर.
मतदारांना २० नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत हेअर ॲंड ब्युटीसंदर्भातील सर्व सेवांच्या मजुरीवर २० टक्के सवलत दिली जाईल. - अतुल टिपुगडे.