Shiv Sena MLA Ulhas Patil, former MP Raju Shetty vote in Shirola | Maharashtra Election 2019 : शिवसेनेचे उल्हास पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ येथे केले मतदान

Maharashtra Election 2019 : शिवसेनेचे उल्हास पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ येथे केले मतदान

ठळक मुद्देशिवसेनेचे उल्हास पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ येथे केले मतदान प्रमुख गावातील मतदानावर उमेदवारांनी केले लक्ष केंद्रित

शिरोळ : शिरोळ विधानसभा मतदार संघासाठी चुरशीची लढत होत आहे. आघाडी व युतीतील बंडखोरीमुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. सोमवारी मतदान प्रक्रिया सुरु झाली.

प्रामुख्याने शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील, जनसुराज्यचे अनिलकुमार यादव, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ येथे मतदान केले. स्वाभिमानीचे अनिल मादनाईक यांनी उदगांव तर दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी जयसिंगपूर येथे मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी शिरोळ येथील राजाराम विद्यालयातील मतदान केंद्रावर उल्हास पाटील व राजेंद्र पाटील-यड्रावकर आमने-सामने आले. यावेळी त्यांनी हस्तांदोलन केले. जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड या तीन शहराबरोबरच जिल्हा परिषद मतदार संघ असलेल्या प्रमुख गावातील मतदानावर उमेदवारांनी लक्ष केंद्रित केल्याचे चित्र दिसत होते.

Web Title: Shiv Sena MLA Ulhas Patil, former MP Raju Shetty vote in Shirola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.