राजू शेट्टी दुसऱ्यांदा कोरोना पॉझीटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 18:52 IST2021-07-20T18:51:56+5:302021-07-20T18:52:53+5:30
CoronaVirus Raju Shetty Kolhapur : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी वर्षभराच्या आतच दुसऱ्यांदा कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असून त्यांची तब्येत उत्तम असल्याचे कुटूंबियांकडून सांगण्यात आले.

राजू शेट्टी दुसऱ्यांदा कोरोना पॉझीटीव्ह
कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी वर्षभराच्या आतच दुसऱ्यांदा कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असून त्यांची तब्येत उत्तम असल्याचे कुटूंबियांकडून सांगण्यात आले.
शेट्टी यांना गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी पूर्ण दक्षता घेतली होती. त्यांचा रोजचा कार्यकर्त्यांशी राबता असतो. आणि सध्या शिरोळमध्येही संसर्गाचे प्रमाण जास्तच आहे. भेटीगाठी, दौरेही अव्याहतपणे सुरुच असतात.
या संपर्कातूनच त्यांना सहा दिवसापुर्वी कणकण जाणवली, लगेच तपासणी केली असता, त्यांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. तेव्हापासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. त्यांना फारसा कांही त्रासही नाही, त्यांची तब्येत वेगाने सुधारत आहे, त्यामुळे काळजीचे कारण नाही, असेही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.