कागल शहरात वर्चस्ववादातून युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 17:28 IST2020-07-24T17:27:10+5:302020-07-24T17:28:04+5:30
वर्चस्ववादातून कागल शहरातील महात्मा फुले वसाहतीतील अक्षय विनायक सोनुले उर्फ अक्षय मॅनर्स या तीस वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. येथील सणगर गल्ली जवळ असलेल्या लक्ष्मी मंदिरासमोर दुपारी वाजता ही घटना घडली.

कागल शहरात वर्चस्ववादातून युवकाचा खून
ठळक मुद्देकागल शहरात वर्चस्ववादातून युवकाचा खून मातंग वसाहतीत मोठा पोलीस बंदोबस्त
कागल : वर्चस्ववादातून कागल शहरातील महात्मा फुले वसाहतीतील अक्षय विनायक सोनुले उर्फ अक्षय मॅनर्स या तीस वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. येथील सणगर गल्ली जवळ असलेल्या लक्ष्मी मंदिरासमोर दुपारी वाजता ही घटना घडली.
अक्षय हा बुलेटवरून घरी जात असताना या मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याला अडविले. त्यांच्यात वादावादी सुरू असतानाच हल्लेखोरानी चाकू, कोयत्याने सपासप वार केले.
वर्मी घाव बसल्याने अक्षय खाली कोसळला. घटनेनंतर हल्लेखोर पळुन गेले. मातंग समाजाची वस्ती असलेल्या या वसाहतीत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.