कोल्हापूर शहरात दोन ठिकाणी मतदान यंत्र बंद पडले, काही वेळ मतदान प्रक्रिया विस्कळीत
By भीमगोंड देसाई | Updated: November 20, 2024 13:18 IST2024-11-20T13:17:02+5:302024-11-20T13:18:53+5:30
कोल्हापूर : उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण दोन मतदान केंद्रावर बुधवारी मतदान यंत्र बंद पडले. यामुळे दोन्ही ठिकाणी ...

कोल्हापूर शहरात दोन ठिकाणी मतदान यंत्र बंद पडले, काही वेळ मतदान प्रक्रिया विस्कळीत
कोल्हापूर : उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण दोन मतदान केंद्रावर बुधवारी मतदान यंत्र बंद पडले. यामुळे दोन्ही ठिकाणी अर्धा तास मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली. रांग वाढली. दरम्यान, तातडीने निवडणूक प्रशासनाने पर्यायी मतदान यंत्र बसवून मतदान प्रक्रिया सुरळीत केली.
‘उत्तर’मधील विक्रम हायस्कूल येथील मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट यंत्र काही काळासाठी सकाळी साडेसात वाजता तांत्रिक अडचणींमुळे बंद झाले होते. ते बदलण्यात आले. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. शहरातील ‘दक्षिण’मधील नेहरूनगर विद्यालय केंद्रात सकाळी दहाच्या सुमारास मतदान यंत्र बंद पडले.
अचानक यंत्रावरील उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटन खराब होवून यंत्रात बिघाड झाले. यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळासाठी बंद ठेवावी लागली. परिणामी रांगेतील काही मतदारांनी मतदान न करता जाणे पसंत केले. सुमारे अर्धा तासांनी दुसरे यंत्र जोडले.