Vidhan Sabha Election 2024: आता तरी ‘देवा (भाऊ)’ मला पावशील का?, कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते सन्मानाच्या प्रतीक्षेत
By समीर देशपांडे | Updated: November 26, 2024 16:26 IST2024-11-26T16:26:08+5:302024-11-26T16:26:37+5:30
समीर देशपांडे कोल्हापूर : जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा २०१९ ते २०२२ च्या जूनपर्यंतचा कालावधी रस्त्यावर आंदोलने करण्यातच गेला. ...

Vidhan Sabha Election 2024: आता तरी ‘देवा (भाऊ)’ मला पावशील का?, कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते सन्मानाच्या प्रतीक्षेत
समीर देशपांडे
कोल्हापूर : जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा २०१९ ते २०२२ च्या जूनपर्यंतचा कालावधी रस्त्यावर आंदोलने करण्यातच गेला. त्यानंतर लोकसभा झाली. जिल्ह्यात एकही जागा भाजपला मिळाली नसताना शिंदेसेनेसाठी गल्लीबोळ पालथे घालावे लागले. ज्या जिल्ह्यात ‘कमळ ब्रॅन्ड’चा एकही आमदार नव्हता, त्याठिकाणी आता अपक्षासह भाजपचे तीन आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपचे राबलेले कार्यकर्ते सन्मानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे त्यांच्या ओठी आता केवळ ‘आता तरी देवा (भाऊ) मला पावशील का’ हे एकमेव गीत आहे.
२०१४ मध्ये चंद्रकांत पाटील मंत्री झाले. इचलकरंजीतून सुरेश हाळवणकर आणि कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक विधानसभेला निवडून आले. शौमिका महाडिक यांच्या रूपाने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्यांदा भाजपला मिळाले. परंतु, महापालिकेतील सत्तेने हुलकावणी दिली. देवस्थान समिती, ‘गोकुळ’मध्ये संधी मिळाली. परंतु, तरीही हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या एकसंघ आघाडीपुढे भाजपला मर्यादा येत होत्या. अशातच २०१९ ला विधानसभेला हाळवणकर आणि महाडिक पराभूत झाले आणि भाजप पुन्हा शून्यावर आला.
त्यानंतर सत्ता मिळाली नाही आणि केवळ आंदोलने करण्याचे हाती उरले. अडीच वर्षांपूर्वी पुन्हा सत्ता आली. परंतु, वाटेकरी वाढले. याच वाटेकऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा आत्ताही सत्ता आली आहे. भाजपने दिमाखदार विजय मिळवला आणि आता कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
औटघटकेची पदे नकोत
२०१९ च्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी भाजपने अनेकांना पदे दिली. परंतु, त्यावर वेळेत राज्यपालांच्या सह्या झाल्या नाहीत आणि अधिकृतपणे या सर्वांना या पदांचा कार्यभारही घ्यायला मिळाला नाही. आत्ताही विधानसभा जाहीर होण्याआधीच पंधरा, वीस दिवस महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या. परंतु, त्या अशा काळात झाल्या की त्या जाहीर करतानाही अडचण वाटल्याने व्हॉट्सॲपवर टाकण्यात आल्या. ज्या पदांचा लाभच घेता येणार नाही, अशी औटघटकेची पदे देऊन पक्षाने कार्यकर्त्यांची चेष्टा करू नये, अशी अपेक्षा आहे.
उमेदवार - मते
- अमल महाडिक - १,४७,९९३
- राहुल आवाडे - १,३१,९१९