corona virus ichlkanrji updates : इचलकरंजीत २३ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 12:53 IST2021-04-10T04:25:20+5:302021-04-10T12:53:06+5:30
corona virus ichlkanrji updates : इचलकरंजी शहर परिसरात कोरोनाचा उपद्रव सुरूच असून, शुक्रवारी एका आठ महिन्यांच्या बाळासह २३ जणांना लागण झाली तर मुक्त सैनिक सोसायटी परिसरातील एका ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

corona virus ichlkanrji updates : इचलकरंजीत २३ कोरोना पॉझिटिव्ह
इचलकरंजी : शहर परिसरात कोरोनाचा उपद्रव सुरूच असून, शुक्रवारी एका आठ महिन्यांच्या बाळासह २३ जणांना लागण झाली तर मुक्त सैनिक सोसायटी परिसरातील एका ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
शहरातील गणेशनगर, जाधव मळा परिसरातील प्रत्येकी तीन, इंदिरा हौसिंग सोसायटी, ऋतुराज कॉलनी व राजीव गांधी भवन परिसरातील प्रत्येकी दोन, तसेच अवधुत आखाडा, विक्रमनगर, भाटले मळा, कोरवी गल्ली, कलानगर, कापड मार्केट, गंगानगर, शहापूर, बंडगर माळ, रेणुकानगर झोपडपट्टी, मुक्त सैनिक वसाहत व नरेंद्र सोसायटी या भागातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
आजतागायत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची चार हजार ३०६ झाली असून, सध्या १३६ जणांवर उपचार सुरू आहेत. तर आजतागायत एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या १९८ वर पोहोचली आहे.