Kolhapur: विसर्जन मिरवणूक महागात, सुतळी बॉम्ब उडाला डोळ्यात; तरुण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 12:24 PM2023-09-30T12:24:28+5:302023-09-30T12:24:47+5:30

बॉम्ब उडत का नाही म्हणून पाहण्यास गेला असता अचानक बॉम्ब उडाला

A young man was seriously injured in a sudden bomb explosion in Kodoli Kolhapur district | Kolhapur: विसर्जन मिरवणूक महागात, सुतळी बॉम्ब उडाला डोळ्यात; तरुण गंभीर जखमी

Kolhapur: विसर्जन मिरवणूक महागात, सुतळी बॉम्ब उडाला डोळ्यात; तरुण गंभीर जखमी

googlenewsNext

कोडोली : कोडोली (ता. पन्हाळा) येथे सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सुतळी बॉम्ब लवकर न उडाल्याने तो उडत का नाही पाहण्यास गेला असता अचानक बॉम्ब उडून डोळ्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने भारत संभाजी चव्हाण (वय २९), रा. देवाळे (ता. पन्हाळा) हा गंभीर जखमी झाला आहे. या ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजेदरम्यान येथील शिवाजी चौकात घडली.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोडोली येथे गुरुवारी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. चव्हाण याची सासुरवाडी कोडोलीत असल्याने तो पत्नीसह विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी कोडोलीत आला होता. चव्हाण हा आपल्या पत्नीसह मिरवणूक पाहत असताना मित्राच्या मंडळाची मिरवणूक शिवाजी चौकात आल्याने तो पत्नीस बाजूला थांबवून मिरवणुकीत सहभागी झाला.

यावेळी लोखंडी पाइपमध्ये सुतळी बॉम्ब लावला होता, तो बराच वेळ उडाला नसल्याने बॉम्ब उडत का नाही म्हणून पाहण्यास तो गेला असता अचानक बॉम्ब उडाल्याने त्याच्या उजव्या डोळ्याला व डोक्याला मोठी दुखापत होऊन तो बेशुद्ध पडला. ही दुर्घटना त्याच्या पत्नीसमोरच घडली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला यशवंत धर्मार्थ रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्रकृती गंभीर होऊ लागल्याने त्याला तातडीने कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

Web Title: A young man was seriously injured in a sudden bomb explosion in Kodoli Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.