केडीएमसीच्या महापौर-उपमहापौरांनी हाती घेतला झाडू; डीप क्लिनिंग मोहिमेचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 21:52 IST2026-02-09T21:52:22+5:302026-02-09T21:52:36+5:30

किल्ले दुर्गाडी देवी मंदिर परिसरात हा शुभारंभ करण्यात आला.

KDMC Mayor and Deputy Mayor take up broom; Deep cleaning campaign launched | केडीएमसीच्या महापौर-उपमहापौरांनी हाती घेतला झाडू; डीप क्लिनिंग मोहिमेचा शुभारंभ

केडीएमसीच्या महापौर-उपमहापौरांनी हाती घेतला झाडू; डीप क्लिनिंग मोहिमेचा शुभारंभ


कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डीप क्लिनिंग स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ सोमवारी महापौर हर्षाली थविल आणि उपमहापौर राहूल दामले यांच्या हस्ते करण्यात आला.

किल्ले दुर्गाडी देवी मंदिर परिसरात हा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्यासह सहाय्यक आयुक्त आयुक्त प्रिती गाडे, मुख्य स्वच्छता अधिकारी आ’गस्टीन घुटे, नगरसेविका अस्मिता मोरे, विजया पोटे, शालिनी वायले, रेखा चौधरी, नगरसेवक गणेश जाधव, गणेश लांडगे, उमेश बोरगांवकर, मोरेश्वर भोईर, जयवंत भोईर, रमेश जाधव आदी सहभागी झाले होते. ही मोहिम आजपासून येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत महापालिकच्या सर्व प्रभागात राबविली जाणार आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्वकष स्वच्छता ठेवुन शहर शाश्वत स्वच्छ कसे राहिल या करिता तसेच स्वच्छतेचे मानांकन उंचावण्यासाठी नगरसेवक आणि नागरिक यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

Web Title : केडीएमसी महापौर और उपमहापौर ने झाड़ू उठाकर डीप क्लीनिंग अभियान शुरू किया।

Web Summary : केडीएमसी के डीप क्लीनिंग अभियान की शुरुआत महापौर थविल और उपमहापौर दामले ने दुर्गा देवी मंदिर में की। यह अभियान 28 फरवरी तक सभी वार्डों में चलेगा। आयुक्त गोयल ने स्थायी स्वच्छता और बेहतर रैंकिंग के लिए नागरिकों और पार्षदों के सहयोग का आग्रह किया।

Web Title : KDMC Mayor and Deputy Launch Deep Cleaning Drive with Brooms.

Web Summary : KDMC's deep cleaning drive started with Mayor Thavil and Deputy Damle at Durga Devi temple. The campaign runs until February 28, across all wards. Commissioner Goyal urges citizen and corporator cooperation for sustainable cleanliness and improved rankings.