गणेश विसर्जनासाठी गेलेले भुसावळातील दोघे बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 23:31 IST2020-09-01T23:28:40+5:302020-09-01T23:31:35+5:30

वासेफ पटेल भुसावळ : गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक तापी नदी पात्रात बेपत्ता झाले आहेत, तर दोन जणांना वाचवण्यात यश ...

Two persons from Bhusawal who went for immersion of Ganesha are missing | गणेश विसर्जनासाठी गेलेले भुसावळातील दोघे बेपत्ता

गणेश विसर्जनासाठी गेलेले भुसावळातील दोघे बेपत्ता

वासेफ पटेल
भुसावळ : गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक तापी नदी पात्रात बेपत्ता झाले आहेत, तर दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. ही घटना १ रोजी सायंकाळी घडली.
सूत्रानुसार, शहरातील शनिमंदिर वार्डातील गणेश मंडळातील १५ कार्यकर्ते हे १ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान गणेश विसर्जनासाठी गेलेले होते. झेड.टी.सी. भागातील स्मशानभूमीसमोरील रेल्वे पुलाखाली मूर्ती विसर्जन करण्याचे नियोजन होते. त्यातील चार जण पाण्यात बुडत होते. त्यातील धीरज संजय शिंदे (वय २१) आणि किरण विश्वास मराठे (वय २६) या दोघांना वाचविण्यात आले. त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर वैभव संजय शिंदे (वय २०) आणि उपेंद्र गुलाब चौधरी (वय १९) (दोन्ही रा.शनिमंदिर वार्ड) हे दोन जण
बेपत्ता झाले आहेत. शोधपथक घटनास्थळी रवाना झाले असून, त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Two persons from Bhusawal who went for immersion of Ganesha are missing