महाराष्ट्र निवडणूक २०१९ : जळगावमध्ये भर पावसात नागरिकांचा मतदानासाठी उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 01:15 PM2019-10-21T13:15:57+5:302019-10-21T13:36:55+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा खुर्द येथील मतदान केंद्रावर आज सकाळी नऊ वाजता रेणुकादास ईटणारे या 90 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीने मतदान केले.

People come out to vote in jalgaon | महाराष्ट्र निवडणूक २०१९ : जळगावमध्ये भर पावसात नागरिकांचा मतदानासाठी उत्साह

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : जळगावमध्ये भर पावसात नागरिकांचा मतदानासाठी उत्साह

Next

जळगाव जामोद - विधानसभा निवडणूकीसाठी मतदान घेण्यात येत आहे. पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी जळगाव जामोद येथे कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय खामगावात भाजपाचे उमेदवार आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, काँग्रेस उमेदवार ज्ञानेश्वर पाटील, नांदुऱ्यात काँग्रेस उमेदवार राजेश एकडे, मलकापूरात ना. चैनसुख संचेती यांनीही मतदान करून नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत केले. 

दुपारी 12 वाजेपर्यंत मलकापूर मतदारसंघात 14.78 टक्के, खामगाव 17.98 टक्के, जळगाव जामोद 15.71 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. खामगाव तालुक्यातील गारडगाव येथे इव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने एका तासाने उशिरा मतदान सुरू झाले. खामगावात भाजपा उमेदवाराने बुथ कॅप्चर केल्याचा आरोप करीत काँग्रेस उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही. यासह सखी मतदान केंद्रावर महिलांनी मतदानासाठी गर्दी केलेली दिसून आली. 

जळगाव जामोद तालुक्यात सकाळी दमदार पाऊस झाला. याही परिस्थितीत नागरिकांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून येत होता. महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी कुटुंबीयांसह मतदान केले. याशिवाय काँग्रेस उमेदवार डॉ. स्वातीताई वाकेकर, माजी आमदार कृष्णराव इंगळे, जळगावच्या नगराध्यक्षा सीमाताई डोबे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारही उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. सोमवारी (18 ऑक्टोबर) सकाळी सात वाजता मतदानाला सर्वत्र शांततेत सुरुवात झाली पाऊस पडत असल्याने मतदान धीम्या पद्धतीने असले तरी उत्साहाने होत आहे. 

तरुण वयोवृद्ध दिव्यांग तथा महिला मतदानासाठी बाहेर पडले आहेत. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व मतदान केंद्रे आद्यवत असून अधिकारी व कर्मचारी आपापली कर्तव्य बजावत आहेत. या विधानसभा मतदार संघात 315 मतदान केंद्रासाठी तब्बल चौदाशे कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त असून स्वयंसेवक दिव्यांग राम मतदारांची ने-आण करीत आहेत. जळगाव शहरात महिलांसाठी सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली. हे मतदान केंद्र निवडणुकीचे आकर्षण ठरत आहे. या दरम्यान मतदान केंद्रांवर बाल संगोपनासाठी महिला, वैद्यकीय कीट साठी महिला आणि बी एल ओ तैनात आहेत.

90 वर्षीय वृद्धाचे मतदान 

जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा खुर्द येथील मतदान केंद्रावर आज सकाळी नऊ वाजता रेणुकादास ईटणारे या 90 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीने मतदान केले. त्यांना व्हीलचेअरवरून मतदान केंद्रात स्वयंसेवकांनी नेले.  दत्तात्रय सुपडा वेरुळकर या दिव्यांग मतदाराने यावेळी मतदान केले. या मतदारांना दे कमालीचा उत्साह दिसून आला. मतदान हा राष्ट्रीय उत्सव असून आम्ही उत्साहाने मतदान करीत असल्याचे यावेळी मतदारांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या 13व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सोमवारी, 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या मत प्रक्रियेमध्ये सुमारे 9 कोटी मतदार 3237 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. राज्यात एकूण 8,98,39,600 मतदार असून यामध्ये 4,68,75,750 पुरुष, 4,28,43,635 महिला, 3,96,000 दिव्यांग, 1,17,581 सर्व्हिस मतदार आणि 2,634- तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडावी, यासाठी आयोगाने केंद्रीय, तसेच राज्य राखीव दलाची मदत घेतली असून, राज्य पोलीस दलातील सुमारे 40 हजार कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तावर असतील. मतदान केंद्राचा परिसर आणि स्ट्राँगरूमच्या बाहेर चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

 

Web Title: People come out to vote in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.