'महाविकास आघाडी'ची वज्रमूठ; महापौर आमचाच! मनसे, वंचितही येणार सोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:28 IST2025-12-25T12:28:09+5:302025-12-25T12:28:21+5:30
जळगाव : महापालिकेच्या रणांगणात महायुतीला रोखण्यासाठी आता राष्ट्रवादीने ( शरद पवार ) कंबर कसली आहे. महापालिकेत यावेळी आमचाच महापौर ...

'महाविकास आघाडी'ची वज्रमूठ; महापौर आमचाच! मनसे, वंचितही येणार सोबत
जळगाव : महापालिकेच्या रणांगणात महायुतीला रोखण्यासाठी आता राष्ट्रवादीने (शरद पवार) कंबर कसली आहे. महापालिकेत यावेळी आमचाच महापौर बसेल. भाजप-शिंदेसेनेविरोधात उध्दवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि मनसे अशा सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊ, असे माजी आमदार तथा पक्षाचे प्रभारी संतोष चौधरी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
मित्र पक्षांसोबत लवकरच बैठक घेण्याचे नियोजन
शहरातील रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि अस्वच्छता या मुद्द्यांवरून संतोष चौधरी यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. आम्ही नागरिकांच्या घरोघरी जाणार आहोत. उध्दव सेना आणि मनसे यांच्यात युती झाल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही या दोन्ही पक्षांसह इतर सर्व मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेणार आहोत. २९ डिसेंबर रोजी आमची अधिकृत उमेदवारी यादी जाहीर केली जाणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला.