राजकीय चर्चांचा रोजचा ‘बस’ प्रवास : सर्वच सत्ताधारी एकाच माळेचे मणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 01:13 PM2019-04-02T13:13:23+5:302019-04-02T13:13:48+5:30

जळगाव ते एरंडोल 34 किमी

Daily bus travels for political discussions: All the rulers have the same festal beads | राजकीय चर्चांचा रोजचा ‘बस’ प्रवास : सर्वच सत्ताधारी एकाच माळेचे मणी

राजकीय चर्चांचा रोजचा ‘बस’ प्रवास : सर्वच सत्ताधारी एकाच माळेचे मणी

Next

कुंदन पाटील
जळगाव : सर्वच राजकारणी सारखे आहेत. सत्तेत असताना कापसाला भाव देत नाहीत आणि सत्तेतून गेल्यावर कापसाला भाव मिळावा म्हणून बोंबा मारतात. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर सांत्वनासाठी आलेल्या या राजकीय जत्थ्याचे तोंड पाहण्यासारखे असते. या अभिनय संपन्न राजकारण्यांपेक्षा शेतकरी आणि ग्रामीण जनतेला न्याय देणारे सरकार ज्यादिवशी सत्तेवर येईल. त्याचदिवशी देश सुखी होईल, असे परखड मत पाळधीच्या गुलाबराव पाटील या प्रवाशाने व्यक्त केले.
खरंतर सरकार कुठलेही असो पण शिक्षणाला प्राधान्यक्रम देणारे असावे. ग्रामीण भागातूनच प्रयोगशीलतेचे अस्त्र हाती घेऊन ते प्राथमिक शिक्षणापासूनच लागू केल्यास खऱ्या अर्थात देशात सर्वार्थाने सक्षम अशी पिढी निर्माण होईल, असे मत भडगाव येथील रहिवासी आणि मु.जे. महाविद्यालयातील फरहीन शेख या विद्यार्थिनीने व्यक्त केले. एरंडोलचे डिगंबर महाजन म्हणतात, भ्रष्टाचारमुक्त सरकारच देशाला न्याय देऊ शकते.
पंतप्रधान मोदींनी त्याची मुहूर्तमेढ रोवली असून ते पुन्हा सत्तेत येतील, असा दावा त्यांनी केला आहे.
शिक्षण,शेतकºयाची दुवा
जळगाव-एरंडोल या ४० मिनिटांच्या प्रवासात प्रवाशांसोबतच्या चर्चेत देशपातळीवर शिक्षण आणि शेतकरीच महत्त्वाचा असल्याचा मतप्रवाह व्यक्त होतो.
युवा पिढी शिक्षण आणि भ्रष्टाचारमुक्तीला प्राधान्य देते. त्यांच्यादृष्टीने गाव, राज्य आणि राष्टÑीय मुद्दे होऊच शकत नाही.पाया मजबूत झाल्याशिवाय देश मजबूत होऊच शकत नाही. त्यामुळे कोणत्याही सरकारने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करावे.

Web Title: Daily bus travels for political discussions: All the rulers have the same festal beads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.