उन्हाच्या कडाक्यातही ६४% मतदान; हिंगोलीच्या मतदारांत दिसला उत्साह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:15 AM2019-04-19T00:15:31+5:302019-04-19T00:15:51+5:30

लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पडले.नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून गुरुवारी मतदान केले. कालच्यापेक्षा आज उन्हाचा पारा चढला होता. ३९ अंश सेल्सिअसवर पारा गेला असताना हिंगोली मतदारसंघात ६४ टक्के मतदानाची नोंद झाली.

64% voting in summers of summer; Hingoli voters appeared enthusiasm! | उन्हाच्या कडाक्यातही ६४% मतदान; हिंगोलीच्या मतदारांत दिसला उत्साह!

उन्हाच्या कडाक्यातही ६४% मतदान; हिंगोलीच्या मतदारांत दिसला उत्साह!

Next

हिंगोली : लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पडले.नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून गुरुवारी मतदान केले. कालच्यापेक्षा आज उन्हाचा पारा चढला होता. ३९ अंश सेल्सिअसवर पारा गेला असताना हिंगोली मतदारसंघात ६४ टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळी ९ पर्यंत ७.६८ टक्के, ११ वाजेपर्यंत २0.५६ टक्के, १ वाजेपर्यंत ३४.0१ टक्के, ३ वाजेपर्यंत ४५.९७ टक्के तर पाच वाजेपर्यंत ५६.२२ टक्के मतदान झाले. मतदानाची अंतिम अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जारी केल्यावर या टक्केवारीत काहीअंशी बदल होण्याची शक्यता आहे.
हिंगोलीमध्ये काँग्रेसचे सुभाष वानखेडे व सेनेचे हेमंत पाटील यांच्यातच मुख्य लढत होती. काही ठिकाणी मात्र वंचित आघाडीही बऱ्यापैकी चालत असल्याचे दिसले. नेत्यांच्या विजयासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शक्ती पणाला लावल्याचे पाहायला मिळाले. निवडणुकीत पहिल्यांदाच ‘ईव्हीएम’सोबतच ‘व्हीव्हीपॅट’चा वापर केला. काही ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड तर काही ठिकाणी ‘व्हीव्हीपॅट’च्या ‘स्लीप’ न दिसणे यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली होती. मतदार यादीतील घोळामुळे मतदारांची तारांबळ उडाली. काही मतदार मतदानापासून वंचित राहिले.
आज दिवसभर उन्हाचा कडाका कमीच होता. त्यामुळे मतदारांचा उत्साह कायम होता. सकाळपासूनच विविध ठिकाणी मतदारांच्या रांगा पहायला मिळत होत्या. हिंगोली व उमरखेड मतदारसंघात मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३ टक्क्यांवर व किनवटला ५४ टक्क्यांवरच मतदान होते. तर कळमनुरी ६१ टक्के, किनवट ५८.३३ टक्के, वसमत ५७.१0 टक्के अशी उत्साहवर्धक स्थिती होती. मागच्या निवडणुकीपेक्षा यंदा टक्केवारी वाढेल, असे मानले जात होते. मात्र अंतिम आकडेवारी तेवढ्यापर्यंतच राहील, असे दिसते. २00९ साली ५९.७१ टक्के तर २0१४ साली ६६.१0 टक्के मतदानाची नोंद झाली होती. यंदा ६४ टक्क्यांचा अंदाज प्रशासनाने वर्तविला. तो मागच्यापेक्षा दोन टक्क्यांनी कमी आहे. मात्र प्रशासनाने अंतिम आकडेवारी जाहीर केल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
... अन् नववधू वाजत-गाजत मतदान केंद्रावर !
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील वधूने बोहल्यावर चढण्याआधीच वाजतगाजत मिरवणूक काढून मतदानाचा हक्क बजावला आहे. या मिरवणुकीची सर्वत्र चर्चा होत आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील भाटेगाव येथील सोनी अवधूतराव हक्के हिचा विवाह श्रीकांत मस्के (रा. जयपूर, ता. वाशिम) या नवरदेवाशी १८ एप्रिल रोजी ११ वाजता ठरल्याप्रमाणे आज पार पडला. मात्र मुलगी तिच्या आयुष्यातील वैयक्तिक आनंदाच्या क्षणात मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी तिच्या वडिलांनी पुढाकार घेतला. लग्नाच्या आधी सकाळीच वधूची वाजतगाजत मिरवणूक काढली. त्यानंतर वधूने तेथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नवरीचे वडील पोलीस पाटील अवधूतराव हक्के, संजय बहातरे, अकलवंत राठोड, संदीप राठोड, तलाठी आर. डी. गिरी, राजू क्षीरसागर, झोनल आॅफिसर भागानागरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. एरवी मुलाची वरात निघते. मात्र वधूही वरातीने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावत असल्याचे वेगळे दृश्य येथे दिसले.
तांत्रिक बिघाडांमुळे काही ठिकाणी विलंब
हिंगोली : मतदान यंत्र अथवा व्हीव्हीपॅटमधील तांत्रिक बिघाडामुळे काही ठिकाणी मतदानाची प्रक्रिया खोळंबल्याचे चित्र होते.
औंढा शहरातील नागनाथ विद्यालयातील बुथ क्रमांक १८५वर असा प्रकार घडला होता. त्यामुळे मतदान विलंबाने सुरू झाले. तालुक्यातील असोला ढोबळे येथे मशीनमध्ये बिघाडामुळे मतदान सकाळी ८.0५ मिनिटांनी सुरू झाले. नंतर सुरळीत सुरू होते. वसमत तालुक्यातील गिरगाव येथे बुथ क्रमांक १८८ वर पूर्णपणे मतदान मशीन बदलण्यात आली. सात वाजून ४0 मिनिटांनी मतदानाला सुरुवात झाली. तर कोठारी येथे व्हीव्हीपॅट मशीन बदलून लगेच मतदानाला सुरुवात झाली. कुरुंदा १४0 क्रमांकाच्या बुथवर तांत्रिक दुरुस्ती करून लगेच मतदानास सुरुवात झाली. कोठारी येथेही मतदारयंत्रामध्ये तांत्रिक दोषामुळे मतदान सुरू होण्यास विलंब झाला होता. येथे ७.३० नंतर मतदानास सुरवात झाली.सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील बुथ क्रमांक ८३ वरील ईव्हीएम मशीन सकाळी ७ वाजल्यापासून तांत्रिक बिघाडामुळे जवळपास दीड तास बंद होती. ती एरर दाखवत असल्याने मशीन सेट बदलला. नंतर ८.२५ मिनिटांनी मतदानाला सुरळीत सुरुवात झाली. आजेगाव येथेही असाच प्रकार घडला होता.

Web Title: 64% voting in summers of summer; Hingoli voters appeared enthusiasm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.