सहा हजारांना तंबाखू सोडण्यास सांगितले, तेव्हा ५७ शौकिनांनी ऐकले !

By कपिल केकत | Published: May 18, 2024 04:20 PM2024-05-18T16:20:24+5:302024-05-18T16:20:50+5:30

बहुतांश म्हणतात सुटत नाही : काही मात्र करून दाखवितात

When six thousand people were asked to quit tobacco, 57 amateurs listened! | सहा हजारांना तंबाखू सोडण्यास सांगितले, तेव्हा ५७ शौकिनांनी ऐकले !

When six thousand people were asked to quit smoking, 57 amateurs listened!

लोकमत न्यूज नेटवर्क
गोदिया :
तंबाखूचे व्यसन झटपट लागू शकते. मात्र, लागलेले व्यसन सोडणे किती कठीण काम आहे, याची प्रचीती जिल्हा सामान्य रुग्णालयाला आली आहे. कारण, मागील वर्षभरात ५,८४३ नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले असून, त्यातील फक्त ५७ नागरिकांनीच मनावर ताबा मिळवून तंबाखू पूर्णपणे सोडण्यात यश मिळविले आहे. बहुतांश रुग्ण समुपदेशन झाल्यावर १५ दिवस, एक महिना तंबाखू सोडतात व काही दिवसांनी परत खाणे सुरू करतात असे समोर आले आहे.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन जीवघेणे असून, याबाबत खुद्द तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावरच छापलेले असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खातात. काही वर्षे हा प्रकार ठीक असतो. मात्र, त्यानंतर पुढे जाऊन जीवघेणे त्यापासून आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, तंबाखूचे सेवन करणाऱ्यांत तरुण व ज्येष्ठ पुरुषांचाच समावेश आहे, असे नाही, तर महिला व शाळेत जाणारी लहान मुलेसुद्धा मागे नसल्याचे दिसून येत आहे.


तंबाखूच्या सेवनापासून त्यांना दूर ठेवता यावे, यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू खाणाऱ्यांचे समुपदेश केले जाते. अशा प्रकारे मागील वर्षभरात जिल्ह्यात ५,८४३ तंबाखू शौकिनांचे समुपदेश करण्यात आले. त्यानंतर कोठे जाऊन फक्त ५७ तंबाखू शौकिनांनी व्यसन सोडले आहे. यावरून तंबाखू शौकिनांना आपल्या जिवापेक्षा तंबाखूचा शौक जास्त प्रिय आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.


कारवाया करून दंडात्मक कारवाई
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध शासकीय कार्यालये, तसेच सार्वजनिक ठिकाणी कारवाया केल्या जातात. अशा प्रकारे वर्षभर कारवायांचे सत्र सुरू असते व त्यातून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, यानंतरही तंबाखूचे व्यसन सोडणारे कमीच दिसून येतात.


साहेब, सुटतच नाही...
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटा- वरच तंबाखूपासून धोक्याबाबत छायाचित्र व सूचना छापलेली असते. मात्र, एवढ्यानं- तरही तंबाखूचे शौकीन ते खातातच. दिवस निघाल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना तंबाखू-गुटखा आवश्यकच असतो. समुप- देशनानंतर १५ दिवस महिनाभर ते तंबाखू सोडतात. मात्र, त्यानंतर परत ती खाण्याकडे वळतात. विचारणा केली असता साहेब, काही केल्या सुटतच नाही, हे कारण सांगून मोकळे होतात.


महिलासुद्धा मागे नाहीत
तंबाखूचे सेवन पुरुषच करतात, असे नसून या शौकिनांमध्ये महिलाही मागे नाहीत. पुरुष तंबाखू, गुटखा, मावा, जर्दा, मशेरी, तपकीर, विडी, सिगारेट, सिगार ई-सिगारेट, पानमसाला, पान या गोष्टींचे सेवन करतात. तेथेच महिला मशेरी, तंबाखू, गुटखा, पान इत्यादींचे सेवन करतात.


दातांवर डाग पडणे, कर्करोगाची पूर्व लक्षणे आढळून येणे, शरीरातील बाकी अवयवांनादेखील कर्करोगाचा धोका होण्याची शक्यता असते, स्त्री आणि पुरुषांच्या प्रजननशक्तीवर परिणाम होणे, दातांची झीज होणे, फुप्फुसांचा कर्करोग आदी महत्त्वाच्ची लक्षणे आहेत.
-डॉ. अनिल आटे, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी

 

Web Title: When six thousand people were asked to quit tobacco, 57 amateurs listened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.