धक्कादायक ! तिकीट मिशनचा स्फोट, कंडक्टर महिलेचा हात भाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 19:14 IST2021-08-27T04:32:09+5:302021-08-27T19:14:36+5:30

गोंदिया : एसटीच्या तिकीट मशीनमध्ये (ईटीआयएम) अचानक ब्लास्ट झाल्याने महिला वाहकाच्या हाताचा पंजा भाजला असून, सुदैवाने ही घटना थोड्यावरच ...

Shocking! The explosion of the ticket mission, the conductor burned the woman's hand | धक्कादायक ! तिकीट मिशनचा स्फोट, कंडक्टर महिलेचा हात भाजला

धक्कादायक ! तिकीट मिशनचा स्फोट, कंडक्टर महिलेचा हात भाजला

ठळक मुद्देएसटी महामंडळाने स्मार्ट तिकिटांसाठी ईटीआयएम मशीन दिल्या आहेत. या मशीनबाबत अनेक तक्रारीसुद्धा आहेत. आता या मशीनचा स्फोट झाल्याने त्याच्या सुरक्षिततेवरसुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे

गोंदिया : एसटीच्या तिकीट मशीनमध्ये (ईटीआयएम) अचानक ब्लास्ट झाल्याने महिला वाहकाच्या हाताचा पंजा भाजला असून, सुदैवाने ही घटना थोड्यावरच टळली. येथील मरारटोली मुख्य आगारात बुधवारी (दि. २५) दुपारी २.१५ वाजतादरम्यान ही घटना घडली.

चालक लीलाधर मडावी (रा. अहेरी) व वाहक कल्पना मेश्राम (३६, रा. अहेरी) हे दोघे अहेरी येथून बस क्रमांक एमएच ४०- एक्यू ६३२० घेऊन गोंदियाला आले होते. बुधवारी (दि. २५) दुपारी २.१५ वाजतादरम्यान ते बसस्थानकात पोहचले व प्रवासी उतरत असताना वाहक कल्पना मेश्राम चालकाच्या बाजूच्या सीटवर बसल्या होत्या तर, तिकीट मशीन समोर ठेवली होती. प्रवासी उतरल्यावर कल्पना मेश्राम यांनी रुट बदलण्यासाठी हात वाढविला होताच की अचानक तिकीट मशीनमध्ये ब्लास्ट झाला व त्यात मेश्राम यांच्या उजव्या हाताचा पंजा भाजला गेला. ब्लास्ट एवढा जबर होता की त्यात मशीन पार वितळून गेली आहे. घटनेनंतर लगेच डेपो प्रशासनाला माहिती देऊन मेश्राम यांच्यावर येथील केटीएस रुग्णालयात आणले असता उपचार करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी (दि. २६) सायंकाळी त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. सुदैवाने ही घटना मेश्राम यांच्या हातावरच बेतली, अन्यथा यामुळे अन्य काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, तिकीट मशीन्सचा करार संपला असून, त्या जुन्या झाल्याने आता नवीन मशीन्सची मागणी कामगार संघटनेचे अध्यक्ष सईद शेख व सचिव अशोक चौरसिया यांनी केली.

ईटीआयएम मशीनच्या सुरक्षिततेवर प्रश्न

एसटी महामंडळाने स्मार्ट तिकिटांसाठी ईटीआयएम मशीन दिल्या आहेत. या मशीनबाबत अनेक तक्रारीसुद्धा आहेत. आता या मशीनचा स्फोट झाल्याने त्याच्या सुरक्षिततेवरसुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे वाहकांमध्ये थोडे भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Shocking! The explosion of the ticket mission, the conductor burned the woman's hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.