Maharashtra Election 2019 ; ऐनवेळी वरूणराजाने केली निवडणूक यंत्रणेची फसगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 06:00 IST2019-10-21T06:00:00+5:302019-10-21T06:00:22+5:30
सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी या मतदारसंघातील ३१० मतदान केद्रांवर पोलिंग पथक रवाना करण्याचे असल्याने सर्व कर्मचारी आणि वाहन येथे एकत्रित करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी पाऊस बरसल्याने येथे चिखल झाला. या चिखलात वाहन अडकल्याने निवडणूक यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली होती.

Maharashtra Election 2019 ; ऐनवेळी वरूणराजाने केली निवडणूक यंत्रणेची फसगत
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : सोमवारी (दि.२१) होऊ घातलेल्या आमगाव विधानसभा मतदारसंघातील मतदानासाठी पोलिंग पथकांची रवानगी रविवारपासून सुरू झाली. मात्र अचानक बरसलेल्या वरूण राजाने निवडणूक यंत्रणेची चांगलीच फसगत केल्याची प्रचिती येथे बघावयास मिळाली. अचानक उद्धभवलेल्या या घटनेने निवडणूक यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि.२१) मतदान घेतले जात आहे. यासाठी येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी औद्यागिक प्रशिक्षण केंद्रात कक्ष स्थापन केले आहे. येथूनच सर्व निवडणूक प्रक्रियांवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी या मतदारसंघातील ३१० मतदान केद्रांवर पोलिंग पथक रवाना करण्याचे असल्याने सर्व कर्मचारी आणि वाहन येथे एकत्रित करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी पाऊस बरसल्याने येथे चिखल झाला. या चिखलात वाहन अडकल्याने निवडणूक यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली होती. ऐनवेळी क्रेन आणि ट्रॅक्टर बोलावून चिखलात फसलेल्या बसेस बाहेर काढून पोलिंग पथक रवाना करण्याची कसरत सुरू होती.
सायंकाळी उशीरापर्यंत पथक रवाना करण्यात आल्याची माहिती संबधितांकडून मिळाली. यामुळे पोलिंग पथक आपल्या गंतव्यस्थानी पोचण्यास उशिर होत आहे. परिणामी, केंद्रावर पोचल्यानंतर होणाºया त्रासापोटी पोलिंग पथकातील कर्मचारी नाराजी व्यक्त करीत असल्याचे दिसून आले.