Maharashtra Election 2019 ; नितीन गडकरींनी मोबाईलवरुन केले सभेला संबोधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST2019-10-19T06:00:00+5:302019-10-19T06:00:19+5:30
खराब वातावरणामुळे नियोजीत दौरा रद्द झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गडकरी म्हणाले, जगात भारताला महाशक्ती बनविण्याचे स्वप्न भारतीय जनता पक्षाचे आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्राचा विकास हाच एक महत्वाचा मुद्या ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने जी विकासाची कास धरली आहे, ती कायम राहण्यासाठी भाजप उमेदवारांना साथ द्या असे सांगितले.

Maharashtra Election 2019 ; नितीन गडकरींनी मोबाईलवरुन केले सभेला संबोधित
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भाजप-सेना युतीचे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी (दि.१८) येथील सर्कस मैदानावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र खराब वातावरणामुळे नागपूर येथून हेलिकाप्टरचे उड्डाण होऊ शकले नाही. त्यामुळे गडकरींना आपला नियोजित दौरा रद्द करावा लागला. मात्र सर्कस मैदानावर सभेला उपस्थित असलेल्या जनतेचा हिरमोढ होऊ नये यासाठी त्यांनी मोबाईलवरुन सभेला संबोधित केले.मतदारसंघात विकासाची गंगा आणण्यासाठी साथ देण्यास सांगितले.
सभेला प्रामुख्याने मध्यप्रदेशचे माजी कृषीमंत्री आ.गौरीशंकर बिसेन, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,उमेदवार गोपालदास अग्रवाल, आ.रामिकशोर कावरे, शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आ.खोमेश रहांगडाले, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा भावना कदम, जि.प.चे माजी अध्यक्ष नेतराम कटरे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, पंकज यादव, रिपाई जिल्हाध्यक्ष राजेश रामटेके, दिनेश दादरीवाल, संजय कुळकर्णी, नंदकुमार बिसेन, अशोक चौधरी, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, सभापती रमेश अंंबुले, राजकुमार नोतानी, गणेश हेमणे, संतोष चव्हाण, डॉ. प्रशांत कटरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खराब वातावरणामुळे गडकरी यांचा नियोजित दौरा रद्द झाल्याने त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या मोबाईलवर कॉल केला. यानंतर पटले यांनी मोबाईल माईकला लावला. गडकरी यांनी पाच ते दहा मिनिटे मोबाईलवरुन सभेला संबोधित केले. खराब वातावरणामुळे नियोजीत दौरा रद्द झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गडकरी म्हणाले, जगात भारताला महाशक्ती बनविण्याचे स्वप्न भारतीय जनता पक्षाचे आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्राचा विकास हाच एक महत्वाचा मुद्या ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने जी विकासाची कास धरली आहे, ती कायम राहण्यासाठी भाजप उमेदवारांना साथ द्या असे सांगितले. गोपालदास अग्रवाल हे एक विकासाचे व्हिजन असलेले त्यांचे व्यक्तिमत्व आहे. भारतीय जनता पक्षाचे व्हिजन केवळ सर्वसामान्यांचा विकास हेच असल्याने यांनी अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले.