Maharashtra Election 2019 ; आज चार ठिकाणी होणार मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 06:00 AM2019-10-24T06:00:00+5:302019-10-24T06:00:06+5:30

मतमोजणीसाठी एकूण ६२ टेबल राहणार असून ७५ पर्यवेक्षक, ७५ सहायक पर्यवेक्षक, ८३ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण २३३ अधिकारी-कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत. अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी १४ टेबलवर होणार असून यासाठी १७ पर्यवेक्षक, १७ सहायक पर्यवेक्षक आणि १९ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण ५३ अधिकारी-कर्मचारी मतमोजणीचे काम करतील.

Maharashtra Election 2019 ; Counting will take place in four places today | Maharashtra Election 2019 ; आज चार ठिकाणी होणार मतमोजणी

Maharashtra Election 2019 ; आज चार ठिकाणी होणार मतमोजणी

Next
ठळक मुद्देमतमोजणी पथकात २३३ कर्मचारी : ६२ टेबलवर होणार मतमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करीता सोमवारी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी (दि.२४) सकाळी ८ वाजतापासून होणार आहे. चारही मतदारसंघात एकूण ६२ टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी २३३ अधिकारी-कर्मचारी राहणार असून यामध्ये राखीव कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.
अर्जनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी अर्जुनी-मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील वखार महामंडळाच्या गोदाम क्र मांक - ३ येथे होणार आहे. तिरोडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येखे होणार आहे.
गोंदिया विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी मरारटोली रोडवरील नवीन जिल्हा क्र ीडा संकुल येथे होणार असून आमगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी देवरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे.
मतमोजणीसाठी एकूण ६२ टेबल राहणार असून ७५ पर्यवेक्षक, ७५ सहायक पर्यवेक्षक, ८३ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण २३३ अधिकारी-कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत. अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी १४ टेबलवर होणार असून यासाठी १७ पर्यवेक्षक, १७ सहायक पर्यवेक्षक आणि १९ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण ५३ अधिकारी-कर्मचारी मतमोजणीचे काम करतील. तिरोडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी १४ टेबलवर होणार असून यासाठी १७ पर्यवेक्षक, १७ सहायक पर्यवेक्षक १९ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण ५३ अधिकारी-कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत.
गोंदिया विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी २० टेबलवर होणार आहे. यासाठी २४ पर्यवेक्षक, २४ सहायक पर्यवेक्षक आणि २६ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण ७४ अधिकारी-कर्मचारी मतमोजणीचे काम करतील. तर आमगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी १४ टेबलवर होणार असून यासाठी १७ पर्यवेक्षक, १७ सहायक पर्यवेक्षक आणि १९ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण ५३ अधिकारी-कर्मचारी मतमोजणीचे काम करणार आहेत.

निकालाला घेऊन उत्सुकता
मतदान आटोपली न आटोपली तोच उमेदवारांच्या जय- पराजयाला घेऊन सर्वत्र चर्चांना उधाण आले. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होत असून विद्यमान चारही आमदार रिंगणात आहेत. अशात त्यांना ही बाजी मारने गरजेचे झाले आहे. त्यामुळेच नागरिकांत निकालाला घेऊन उत्सुकता अधिकच आहे. शिवाय, काही ठिकाणी बंडखोरांनी वातावरण तापविले असल्याने जनता निकालाला घेऊन अधिकच उत्सूक दिसून येत आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Counting will take place in four places today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.