Maharashtra Election 2019 ; उमेदवारांच्या अकाऊंटवर भलत्यांचेच ‘एफिडेव्हीट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:00 AM2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:00:10+5:30

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तसेच अर्ज टाकून काही कारणांनी मागे घेणाऱ्या किंवा नाकारण्यात आलेल्यांचेही खाते येथे पाहवयास मिळते. मात्र या संकेत स्थळावर काही उमेदवारांच्या खात्यात त्यांच्याऐवजी भलत्यांचेच शपथपत्र जोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात रिंगणात असलेल्या तीन उमेदवारांबाबत हा प्रकार घडल्याचे आढळले.

Maharashtra Election 2019 ; Candidates 'affidavit' on account of candidates | Maharashtra Election 2019 ; उमेदवारांच्या अकाऊंटवर भलत्यांचेच ‘एफिडेव्हीट’

Maharashtra Election 2019 ; उमेदवारांच्या अकाऊंटवर भलत्यांचेच ‘एफिडेव्हीट’

Next
ठळक मुद्देनिवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावरील प्रताप। जिल्ह्यातील तीन उमेदवारांचा समावेश

कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची वैयक्तीक माहिती जाणून घेण्यासाठी निवडणूक आयोगाची एक विशिष्ट संकेत स्थळ आहे. त्यावर उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेले शपथपत्र (एफिडेव्हीट) पाहण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र जिल्ह्यातील तीन उमेदवारांच्या खात्यावर भलत्यांचेच एफिडेव्हीट जोडण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. परिणामी या उमेदवारांची संपूर्ण माहितीच चुकीची दाखविली आहे.
देशात लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली जाते. यात जनतेला आपल्या पसंतीचा उमेदवार निवडण्याचा अधिकार आहे. यासाठी संबंधितांची संपूर्ण माहिती जाणून घेण्याची गरज असते. अशात निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर कुणीही त्यांच्या क्षेत्रात निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतो. उमेदवाराने त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेले शपथपत्र निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावरील त्यांच्या खात्यात पाहण्यासाठी उपलब्ध केले जाते. त्यानुसार, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तसेच अर्ज टाकून काही कारणांनी मागे घेणाऱ्या किंवा नाकारण्यात आलेल्यांचेही खाते येथे पाहवयास मिळते. मात्र या संकेत स्थळावर काही उमेदवारांच्या खात्यात त्यांच्याऐवजी भलत्यांचेच शपथपत्र जोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात रिंगणात असलेल्या तीन उमेदवारांबाबत हा प्रकार घडल्याचे आढळले. यात, गोंदिया विधानसभा मतदारसंघातून रिंगणात असलेले चनिराम मेश्राम यांच्या खात्यात त्यांच्याऐवजी मारोतराव हुके पाटील (भोकर) यांचे शपथपत्र दिसत आहे. लक्ष्मण मेश्राम यांच्या खात्यात संजय गेंदलाल डोके (मध्य नागपूर) यांचे शपथपत्र दिसत आहे. अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातून शिवदास श्रावण साखरे यांच्या खात्यात बळवंत बसवंत वानखडे (दर्यापूर) यांचे शपथपत्र दिसत आहे. आता प्रकार घडल्याने जनतेला या उमेदवारांबाबतची माहिती जाणून घेणे शक्य नाही. कारण, या उमेदवारांचे शपथपत्रच नसल्याने त्यांची संपूर्ण माहितीच दडपल्या गेली आहे.ही चूक कुणाची हे जाणून घेण्यात तथ्य नाही. मात्र निवडणूक यंत्रणेच्या कारभारात एवढी मोठी चूक अपेक्षित नाही.

रिंगणाबाहेरील उमेदवारांनाही फटका
विशेष म्हणजे, हा प्रकार फक्त रिंगणात असलेल्या उमेदवारांसोबतच घडला असे नाही.तर रिंगणाबाहेर असलेल्या काही उमेदवारांसोबतही घडला आहे. जिल्ह्यातच चार-पाच जणांसोबत हा प्रकार घडला असताना अवघ्या राज्यात किती उमेदवारांच्या खात्यात अशी चूक झाली आहे हे सांगणे कठीण आहे. यामुळे मात्र निवडणूक यंत्रणेतील गोंधळही चव्हाट्यावर आला आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Candidates 'affidavit' on account of candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.