गणपती बाप्पा पावले! कोकण रेल्वेवर २३ ऑगस्टपासून विशेष सेवा; साप्ताहिक ट्रेनची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 09:01 IST2025-08-04T09:00:09+5:302025-08-04T09:01:58+5:30

गणेश चतुर्थीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

special service on konkan railway from 23 august 2025 weekly train facility also included for ganpati festival 2025 | गणपती बाप्पा पावले! कोकण रेल्वेवर २३ ऑगस्टपासून विशेष सेवा; साप्ताहिक ट्रेनची सुविधा

गणपती बाप्पा पावले! कोकण रेल्वेवर २३ ऑगस्टपासून विशेष सेवा; साप्ताहिक ट्रेनची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: गणेश चतुर्थीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. २३ ऑगस्टपासून १० सप्टेंबरपर्यंत या रेल्वे गाड्या धावणार आहेत. तर साप्ताहिक गाड्यांची सुविधाही देण्यात आली आहे.

गाड्यांची यादी व वेळापत्रक : गाडी क्रमांक ०११५५ व ०११५६ दिवा जंक्शन ते चिपळूण व परत. गाडी क्रमांक ०११५५ ही गाडी २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत दिवा जंक्शनवरून ०७.१५ वा. सुटेल व चिपळूण स्थानकावर १४.०० वा. पोहोचेल.

गाडी क्र. ०११५६ चिपळूण येथून १५.३० वा. सुटेल व दिवा जंक्शनवर त्याच दिवशी २२.५० वा. पोहोचेल.

गाडी क्र. ०११६५ व ०११६६ लोकमान्य टिळक ते मडगाव व परत. या ट्रेन साप्ताहिक असून ०११६५ क्रमांकाची गाडी लोकमान्य टिळक स्थानकाहून २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर व ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री पाऊण वा. सुटेल व मडगाव स्थानकावर त्याच दिवशी १४.३० वा. पोहोचेल.

०११६६ क्रमांकाची रेल्वे मडगाव स्थानकाहून २६ ऑगस्ट, २ व ९ सप्टेंबर या दिवशी १६.३० वा. सुटेल व लोकमान्य टिळक स्थानकावर दुसऱ्या दिवशी ०४.५० वा. पोहोचेल. ही गाडी गोव्यात थिवी व करमळी या स्थानकावर थांबेल.

गाडी : ०११८५ व ०११८६ लोकमान्य टिळक ते मडगाव व परत (साप्ताहिक), गाडी ०११८५ लोकमान्य टिळक स्थानकावरून २७ ऑगस्ट व ३ सप्टेंबर या दिवशी ००.४५ वा. सुटेल व मडगाव स्थानकावर त्याच दिवशी १४.३० वा. पोहोचेल. गाडी क्रमांक ०११८६ मडगावहून २७ ऑगस्ट व ३ सप्टेंबर असे दोन दिवस १६.३० वा. सुटेल.

गाडी क्रमांक ०११२९ व ०११३० लोकमान्य टिळक ते सावंतवाडी रोड (साप्ताहिक). ०११२९ क्रमांकाची गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून २६ ऑगस्ट, २ व ९ सप्टेंबर असे तीन दिवस ०८.४५ वा. सुटेल व सावंतवाडी रोड स्थानकावर त्याच दिवशी २२.२० वा. पोहोचेल.

०११३० क्रमांकाची गाडी सावंतवाडी रोड स्थानकावरून २६ ऑगस्ट, २ व ९ सप्टेंबर असे तीन दिवस २३.२० वा. सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनसवर दुसऱ्या दिवशी ११.४५ वा. पोहोचेल. 

गाडी क्र. ०१४४५ व ०१४४६ पुणे जंक्शन ते रत्नागिरी व परत (साप्ताहिक). क्र. ०१४४५ पुणे जंक्शनहून २६ ऑगस्ट, २ व ९ सप्टेंबर असे तीन दिवस ००.२५ वा. सुटेल व रत्नागिरीला त्याच दिवशी ११.५० वा. पोहोचेल.

०१४४६ क्रमांकाची गाडी रत्नागिरीहून २६ ऑगस्ट, २ व ९ सप्टेंबर असे तीन दिवस १७.५० वा. सुटेल व पुणे जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी ५.०० वा. पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४४७ व ०१४४८ पुणे जंक्शन ते रत्नागिरी (साप्ताहिक) : ट्रेन क्रमांक ०१४४७ शनिवार २३ ऑगस्ट, ३० ऑगस्ट व ६ सप्टेंबर असे तीन दिवस पुणे जंक्शनवरून ००.२५ वा. सुटेल व रत्नागिरीला त्याचदिवशी ११.५० वा. पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४४८ क्रमांकाची गाडी शनिवार २३ व ३० ऑगस्ट व ६ सप्टेंबर असे तीन दिवस रत्नागिरीहून १७.५० वा. सुटेल व पुणे जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी ५.०० वा. पोहोचेल.

 

 

Web Title: special service on konkan railway from 23 august 2025 weekly train facility also included for ganpati festival 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.