Gadchiroli death of teacher while on election duty | Maharashtra Election 2019; गडचिरोलीत निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना प्रकृती बिघडून शिक्षकाचा मृत्यू

Maharashtra Election 2019; गडचिरोलीत निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना प्रकृती बिघडून शिक्षकाचा मृत्यू

ठळक मुद्देफिट आल्याने लागला डोक्याला मार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील पुरसुलगोंदी या अतिसंवेदनशील भागातील मतदान केंद्रावर सहकारी कर्मचाऱ्यांसोबत पायी जाताना भोवळ येऊन पडल्याने एका शिक्षकाचा मृत्यू झाला. बापू पांडू गावडे (45 वर्षे) राहणार दोड्डीटोला, एटापल्ली असे मृत शिक्षकाचे नाव आहे. गावडे हे बेस कॅम्पवरून रविवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी इतर कर्मचाऱ्यांसोबत पोलीस संरक्षणात मतदान केंद्राकडे जात होते. दरम्यान त्यांना फिट येऊन ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना एटापल्ली येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून  कुटुंबियांसोबत त्यांना चंद्रपूर येथे दुपारी 2 वाजताच्या सुमारास पुढील उपचारासाठी भरती केले. मात्र मध्यरात्री 1 वाजून 30 मिनिटांनी त्यांचे दवाखान्यात निधन झाले.
फिट येऊन खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला व त्यामुळे त्यांचा दुदैर्वी मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Gadchiroli death of teacher while on election duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.