Ganesh utsav Special Receipe 2019 : How to make kalakand at home | Ganesh Utsav Special Recipe: गणरायाच्या नैवेद्यासाठी घरीच तयार करा कलाकंद!

Ganesh Utsav Special Recipe: गणरायाच्या नैवेद्यासाठी घरीच तयार करा कलाकंद!

मिठाई तर सर्वांनाच आवडते. अशातच सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे घराघरांमध्ये गोड पदार्थ आणि मिठाईंची रेलचेल सुरू आहेच. अशातच बाप्पाच्या नैवेद्यासाठी अनेक हटके पदार्थ तयार केले जातात. खासकरून दूधापासून पदार्थ तयार करण्यात येतात. 

आज आम्ही तुम्हाला घरीच कलाकंद तयार करण्याची रेसिपी सांगणार आहोत. दूध आणि पनीरपासून तयार करण्यात आलेली ही मिठाई आरोग्यदायी आहेच पण चवीलाही अत्यंत भारी आहे. बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही झटपट तयार करू शकता कलाकंद... 

कलाकंद तयार करण्यासाठी लागणारं साहित्य : 

  • क्रिम असलेलं दूध 
  • किसलेलं पनीर 
  • ड्रायफ्रुट्स
  • तूप 
  • वेलची 

 

कलाकंद तयार करण्याची कृती : 

- एक कढई गॅसवर मंद आचेवर ठेवा. आता यामध्ये दूध एकत्र करा आणि काहीवेळाने त्यामध्ये किसलेलं पनीर टाकून मिश्रण एकजीव करून घ्या. मिश्रण चमच्याच्या मदतीने एकत्र करा. 

- जेव्हा मिश्रण घट्ट होऊ लागेल तेव्हा त्यामध्ये तूप एकत्र करा आणि 3 ते 4 मिनिटांसाठी गॅसवर एकत्र करत राहा. तूप व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर गॅस बंद करा. 

- आता एका ट्रेला व्यवस्थित तूप लावून त्यामध्ये मिश्रण पसरवून घ्या. 

- आता तुम्ही ड्राय फ्रुट्सच्या मदतीने गार्निश करू शकता. ट्रे 2 ते 3 तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर बाहेर काढून त्याच्या वड्या पाडा. 

- बाप्पाच्या नैवेद्यासाठी टेस्टी कलाकंद तयार आहेत. 

Web Title: Ganesh utsav Special Receipe 2019 : How to make kalakand at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.