Ganesh Mahotsav 2019 : know how make kishmish modak | Ganesh Chaturthi 2019 : बाप्पासाठी तयार करा खास मनुक्यांचे मोदक, जाणून घ्या रेसिपी!
Ganesh Chaturthi 2019 : बाप्पासाठी तयार करा खास मनुक्यांचे मोदक, जाणून घ्या रेसिपी!

Ganesh Chaturthi 2019 :  गणेश उत्सवात जेवढी मजा जल्लोषाची असते तेवढीच उत्सुकता असते ती मोदकांची. या दिवसात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बाप्पामुळे आपल्यालाही चाखायला मिळतात. बाप्पाचं घरी आगमन झालं की, त्याचे आदरातिथ्य करण्यात कोणतीच कसर ठेवली जात नाही. त्याला आवडणाऱ्या साऱ्या गोष्टी करण्यात येतात. इतकेच नाही तर बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यासाठी उकडीचे मोदक, तळलेले मोदक, मावा मोदक यांसारखे मोदक तयार करण्यात येतात किंवा बाजारातून विकत आणले जातात. पण असेच काही वेगळे मोदक तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता. आज जाणून घेऊया मनुक्यांचे मोदक तयार करण्याची रेसिपी...

साहित्य : 

एक वाटी काजू 

एक वाटी मनुका 

एक वाटी साखर 

पाव लीटर दूध 

एक वाटी दुधाची पावडर 

तूप तळण्यासाठी 

कृती : 

- मनुका, काजू मिक्सरमधून बारीक करुन घ्या. 

- बारिक झाल्यावर त्यात थोडी दूधाची पावडर घाला. 

- मिश्रण जाडसर झाल्यावर त्यात थोडे दूध ओतून चांगले एकजीव करा. 

- नंतर साचा वापरून त्याचे मोदक तयार करा. 

- तयार मोदक मंद आचेवर तुपामध्ये तळून घ्या. 

- मिश्रण घट्ट असायला हवे, पातळ झाले तर मोदक तळताना तुटण्याची शक्यता असते. 

- बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी मनुक्यांचे मोदक तयार आहेत. 
 


Web Title: Ganesh Mahotsav 2019 : know how make kishmish modak
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.