Ganesh Chaturthi Recipe: झटपट तयार होणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची बर्फी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 02:28 PM2019-08-29T14:28:25+5:302019-08-29T14:30:31+5:30

गणेशोत्सव म्हणजे, सगळीकडे प्रसन्न वातावरण. बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. बाप्पासाठी आरास केली जाते. तसेच लाडक्या गणरायासाठी गोड पदार्थांचा नैवेद्यही करण्यात येतो.

Ganesh Chaturthi 2019 : ganesh festival special receipe how to make tasty and easy coconut barfi | Ganesh Chaturthi Recipe: झटपट तयार होणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची बर्फी!

Ganesh Chaturthi Recipe: झटपट तयार होणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची बर्फी!

Next

गणेशोत्सव म्हणजे, सगळीकडे प्रसन्न वातावरण. बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. बाप्पासाठी आरास केली जाते. तसेच लाडक्या गणरायासाठी गोड पदार्थांचा नैवेद्यही करण्यात येतो. आपल्या सर्वांना माहितच आहे की, गणपतीला मोदक खूप आवडतात. पण त्याहीपेक्षा थोडा वेगळा नैवेद्य बाप्पासाठी तुम्ही तयार करू शकता. 

दररोज गजाननाच्या आरतीनंतर त्याला नैवेद्य दाखवण्यात येतो. आज आम्ही तुम्हाला एका अशा मिठाईची रेसिपी सांगणार आहोत, जी तुम्ही घरच्या घरी सहज तयार करू शकता. जाणून घेऊयात घरच्या घरी नारळाची बर्फी तयार करण्याच्या रेसिपीबाबत. अशी नारळाची बर्फी जी खाताच तोंडात विरघळून जाईल...

साहित्य :

  • खवलेलं खोबरं - 250 ग्रॅम
  • साखर 200 ग्रॅम
  • दूध अर्धा कप
  • तूप 1 चमचा
  • वेलची पूड अर्धा चमचा
  • सुका मेवा (बारिक तुकडे)
     

कृती :

- एका बाउलमध्ये दूध घेवून त्यामध्ये साखर विरघळवून घ्या. 

- त्यामध्ये खवलेलं खोबरं टाकून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.

- कढई गॅसवर ठेवून थोडी तापू द्या. त्यामध्ये तयार मिश्रण घालून थोडं शिजवून घ्या. 

- मिश्रण जळणार नाही याची काळजी घ्या. 

- मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पूड एकत्र करा.

- मिश्रण नीट एकजीव झाल्यानंतर थोडं घट्ट होऊ लागेल. त्यानंतर गॅस बंद करून कढई गॅसवरून उतरवा.

- एका ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये तूप लावा आणि त्यामध्ये तयार मिश्रण टाका. 

- त्या ताटामध्ये मिश्रण एका लेव्हलमध्ये पसरून घ्या.

- त्यानंतर ते ताट थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा.

- बर्फी व्यवस्थित घट्ट झाल्यानंतर तिच्या वड्या पाडा.

- एका ताटामध्ये बर्फी घेवून त्यावर सुका मेवा टाकून नैवेद्य दाखवा.

Web Title: Ganesh Chaturthi 2019 : ganesh festival special receipe how to make tasty and easy coconut barfi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.