Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर विराट कोहलीचे शेजारी होतील विक्की-कतरिना, वाचा किती असेल एका महिन्याचं भाडं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 18:58 IST

मीडिया रिपोर्ट्सनुसार विक्की कौशलने कतरिना कैफसोबत लग्न झाल्यानंतर राहण्यासाठी परफेक्ट घर शोधलं आहे. जुहूमधील या घरासाठी विक्की मोठी रक्कम देणार आहे.

विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. दोघांचं लग्न डिसेंबरमध्ये होणार असल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान एक नवीन अपडेट समोर आली आहे. आधी सांगितलं जात होतं की, दिग्दर्शक कबीर खानच्या घरी विक्की कौशल आणि कतरिनाची रोका सेरेमनी झाली. आता ताज्या रिपोर्टनुसार, कपल लग्नानंतर सोबत राहण्यासाठी नव्या घराचा शोध घेत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार विक्की कौशलने कतरिना कैफसोबत लग्न झाल्यानंतर राहण्यासाठी परफेक्ट घर शोधलं आहे. जुहूमधील या घरासाठी विक्की मोठी रक्कम देणार आहे. असं सांगितलं जात आहे की, विक्की आणि कतरिना बऱ्याच दिवसांपासून घर शोधत आहे.

आता त्यांना त्यांचं स्वप्नातील घर सापडलं आहे. दोघांनी मुंबईच्या जुहू भागात एका लक्झुरिअस अपार्टमेंट भाड्याने घेतलं आहे. याच बिल्डींगमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली राहतात. त्यासोबत कतरिना तिची बेस्ड फ्रेन्ड अनुष्का शर्माची शेजारी होणार आहे.

किती असेल घराचं भाडं?

रिअल इस्टेट पोर्टल सांभाळणारे वरूण सिंहने इंडिया टुडेला याबाबत माहिती दिली. वरूणने सांगितलं की, 'विक्की कौशलने जुहूतील राजमहलमध्ये अपार्टमेंट भाड्याने घेतलं आहे. ही गेल्या आठ वर्षापासून एक अल्ट्रा लक्झुरिअस बिल्डींग आहे. त्याने जुलै २०२१ मध्ये या बिल्डींगच्या आठव्या फ्लोरवरील अपार्टमेंट भांड्याने घेतलं होतं'.

वरूणने पुढे सांगितलं की, 'विक्कीने सिक्युरिटी डिपॉझिटच्या रूपात जवळपास १.७५ कोटी रूपये भरले आहेत. सुरूवातीच्या  ३६ आठवड्यांसाठी तो दर महिन्याला ८ लाख रूपये भाडं येईल. त्यानंतर पुढील १२ महिन्यांसाठी दर महिन्यात ८.४० लाख रूपये आणि नंतरच्या १२ महिन्यांसाठी विक्की कौशल दर महिन्याला ८.८२ लाख रूपये भाडं देईल'.

 

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफबॉलिवूड