Join us
Daily Top 2Weekly Top 5

'भलेही ती माझ्यापेक्षा 26 वर्षांनी लहान असेल, पण..'; मिलिंद सोमणने केला अंकिताविषयी मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 16:11 IST

Milind soman: अंकिता, मिलिंदपेक्षा २६ वर्षांनी लहान असून अभिनेत्याने एका मुलाखतीमध्ये त्यांच्या नात्याचं एक सिक्रेट ओपन केलं आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि मॉडल मिलिंद सोमण (Milind Soman) त्याच्या अभिनयासह फिटनेसमुळेही चर्चेत येत असतो. वयाच्या ५६ व्या वर्षीही फिट असणाऱ्या मिलिंदने फिटनेसच्या दुनियेत एक वेगळाच बेंचमार्क सेट केलाय. त्यामुळे तरुणांपासून वृद्धांपर्यंत तो सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असतो. अभिनय आणि फिटनेसमुळे चर्चेत येणारा मिलिंद अनेकदा त्याच्या पत्नीमुळे अंकिता कुंवरमुळेही चर्चेत येतो.  अंकिता, मिलिंदपेक्षा २६ वर्षांनी लहान असून अभिनेत्याने एका मुलाखतीमध्ये त्यांच्या नात्याचं एक सिक्रेट ओपन केलं आहे.

मिलिंद आणि अंकिता यांच्या वयात बरंच अंतर असल्यामुळे अनेकदा या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र, सततच्या होणाऱ्या या ट्रोलिंगकडे ही जोडी दुर्लक्ष करते.  परंतु, एका मुलाखतीमध्ये मिलिंदने त्यांच्या वयातील अंतराविषयी भाष्य केलं होतं. मिलिंदने त्यांच्या पर्सनल आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या होत्या.

"ही खूप नॉर्मल गोष्ट झालीये आता की लोक मला आमच्याविषयी प्रश्न विचारतात. भलेही मी वयाने अंकितापेक्षा मोठा असेन. पण, फिजिकली फिटनेसच्या बाबतीत मी तिच्यापेक्षा कैकपटीने फिट आहे. मला स्वत: या गोष्टी जाणवल्या आहेत", असं मिलिंद म्हणाला होता.

दरम्यान, २०१८ मध्ये मिलिंदने अंकितासोबत लग्न केलं. अंकितापूर्वी मिलिंदचं पहिलं लग्न झालं होतं. २००६ मध्ये त्याने Mylene Jampanoi सोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, त्यांचं नात फार काळ टिकलं नाही. २००९ मध्ये ही जोडी विभक्त झाली.  त्यानंतर त्याने २०१८ मध्ये अंकितासोबत दुसरं लग्न केलं.

टॅग्स :मिलिंद सोमण बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन