Join us

करण जोहर आहे रिलेशनशीपमध्ये?; लग्न करण्याविषयी म्हणाला, 'मी माझा वेळ फक्त..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 15:14 IST

Karan johar: करण शक्यतो त्याच्या खासगी आयुष्याविषयी बोलणं टाळतो. मात्र, पहिल्यांदाच तो रिलेशनशीप, लग्न यावर व्यक्त झाला आहे.

कुछ कुछ होता हैं', 'कभी खुशी कभी गम', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' असे कितीतरी सुपरहिट सिनेमाबॉलिवूडला देणारा दिग्दर्शक, निर्माता म्हणजे करण जोहर (karan johar). प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल आयुष्यामुळे करण बऱ्याचदा चर्चेत येतो. यात त्याच्या लग्नाची चर्चा तर कायमच नेटकऱ्यांमध्ये होते.  करण आज त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.यामध्येच करणची एक जुनी मुलाखत चर्चेत आली असून त्याने या इंटरव्ह्यूमध्ये त्याच्या लग्नाविषयी भाष्य केलं आहे.

करणने 'फर्स्टपोस्ट'ला २०१८ मध्ये एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याला लग्नाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्याने उत्तर दिलं. "आता मुळात खूप उशीर झालाय. आता वयाच्या ४६ (२०१८ मधील वय) व्या वर्षी तर मी रिलेशनशीपमध्ये राहू शकत नाही. मी निंदा करणारा नाही तर व्यावहारिक आहे. मला नाही वाटत की मी माझा वेळ, माझे नातेसंबंध, मुलं आणि आई यांच्यासोबत विभागू शकेन. असं नाहीये की एकाच व्यक्तीला दुसऱ्यासाठी कायम त्याग करावा लागतो. पण, मी माझा वेळ फक्त माझं कामसोबतच वाटू शकतो", असं करण म्हणाला.

करण आहे रिलेशनमध्ये?

"आणि अखेर शेवटी मी हे सांगू शकतो की मी माझ्यासोबतच रिलेशनशीपमध्ये आहे. आणि, ज्यावेळी तुम्ही त्यांच्यापैकी एक असता त्यावेळी तुमच्याकडे इतर कोणासाठीही वेळ किंवा मनात जागा नसते." दरम्यान, करणने अद्यापही लग्न केलेलं नाही. २०१७ मध्ये सरोगसी पद्धतीने तो पिता झाला आहे. यश आणि रुही अशी त्याच्या दोन्ही जुळ्या मुलांची नाव आहेत.

टॅग्स :बॉलिवूडकरण जोहरसिनेमासेलिब्रिटी