Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकेकाळी हॉटेलसमोर उभं राहून विद्या बालनने मागितली होती भीक; अनुभव सांगत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 10:00 IST

Vidya balan: एक काळ असा होता जेव्हा तिला हॉटेलसमोर उभं राहून भीक मागावी लागली होती.

झिरो फिगरचा ट्रेंड मोडीत काढणारी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे विद्या बालन (Vidya Balan). कोणत्याही गॉडफादरशिवाय विद्याने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सशक्त आणि दमदार अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या विद्याने आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते. विद्या आज एक लक्झरी लाइफ जगत आहे. मात्र, एक काळ असा होता जेव्हा तिला हॉटेलसमोर उभं राहून भीक मागावी लागली होती. एका मुलाखतीमध्ये तिने हा खुलासा केला आहे.

विद्या लवकरच नियत या क्राइम थ्रिलर सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे सध्या या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती अनेक ठिकाणी हजेरी लावत आहे. यावेळी  तिने Mashable ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिच्यावर एकेकाळी ओढावलेल्या संकटाविषयी भाष्य केलं.

"मी IMG म्हणजेच इंडियन म्युझिक ग्रुपमध्ये काम करायचे. ते दरवर्षी शास्त्रीय संगीत मैफल, भारतीय शास्त्रीय संगीत मैफल यांचं आयोजन करायचे. ही मैफल तीन दिवस-रात्र चालायची. या शोच्या आयोजन समितीमध्ये मी काम करायचे. खरं तर मी स्वयंसेवक होते. कार्यक्रमाच्या आयोजनात आम्ही मदत करायचो.आणि, रात्री शो संपला की नरिमन पॉइंटला फिरायला जायचो, असं विद्या म्हणाली.

पुढे ती म्हणते, "एकदा एका मित्राने मला चॅलेंज दिलं की, रात्री ओबेरॉय- द पाम्प या कॉफी शॉपचं दार वाजवायचं आणि काही तरी खायला मागायचं. मी एक अभिनेत्री होते हे त्यांना त्यावेळी माहित नव्हतं. मी दरवाजा वाजवत राहिले. पण, कोणी दार उघडत नव्हतं त्यामुळे सगळे चिडचिड करत होते. थोड्या वेळाने त्यांनी दार उघडलं.  प्लीज, मला काही तरी खायला द्या मी कालपासून काहीच खाल्लं नाहीये. यावेळी मी करत असलेली अॅक्टींग पाहून सगळेच थक्क झाले.आणि, मला दिलेलं चॅलेंज मी पूर्ण केलं."

दरम्यान, विद्या लवकरच नियत या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शक अनु मेनन करत आहेत. या सिनेमात विद्यासोबत राम कपूर, राहुल बोस, नीरज काबी, शहाना गोस्वामी, अमृता पुरी, दीपन्निता शर्मा आणि निक्की वालिया ही स्टारकास्ट झळकणार आहे.

टॅग्स :विद्या बालनबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा