Join us

'इथूनच बबिता-जेठालालचं कॅरेक्टर कॉपी झालंय'; निळू फुले-अशोक सराफ यांचा हा व्हिडीओ पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 18:46 IST

Ashok saraf nilu phule viral video: 'गाव तस चांगलं पण वेशीला टांगलं' या सिनेमातील हा सीन आहे.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. या मालिकेने आजवर प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या मालिकेविषयी अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा काही भन्नाट मीम्सही पाहायला मिळतात. सध्या नेटकऱ्यांमध्ये या मालिकेशी निगडीत असंच एक मीम व्हायरल होतंय. विशेष म्हणजे हे मीम अभिनेता निळू फुले आणि अशोक सराफ यांच्या एका जुन्या चित्रपटावरुन केलं आहे.

सोशल मीडियावर मीम्स करणारे अनेक पेज असल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच एका पेजवर एक मजेशीर मीम करण्यात आलं आहे. 'गाव तस चांगलं पण वेशीला टांगलं' या सिनेमातीलनिळू फुले, उषा नाईक आणि अशोक सराफ यांचा एक सीन आहे. या सिनेमात उषा नाईक यांच्या भूमिकेचं नाव बबिता असतं. त्यामुळे हा सीन सुरु असताना अशोक सराफ, उषा नाईक यांना विनोदी अंदाजात बबिता वहिनी अशी हाक मारतात. हाच व्हिडीओ एडिट करुन त्याला जेठालाल, बबिता आणि अय्यर अशी नावं देण्यात आली आहेत.  

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत. इतकंच नाही तर तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील जेठालाल आणि बबिता हे पात्र याच सिनेमातून घेतल्याचं काही जणांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनसेलिब्रिटीसिनेमानिळू फुलेअशोक सराफ