विकी कौशल (vicky kaushal) सध्या 'छावा' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात विकीने साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका चांगलीच गाजली. 'छावा' सिनेमातील आजवर अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 'छावा' (chhaava movie) सिनेमातील असाच एक किस्सा सध्या चर्चेत आहे. लवकरच रमजान ईद देशभरात साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने विकीने 'छावा'च्या सेटवरील खास किस्सा सांगितला. रमजान असूनही काहीही न खाता-पिता सर्व आर्टिस्टने शूट कसं केलं, याबद्दल विकी म्हणालाविकी कौशलने सांगितला खास किस्सा
विकीने 'छावा'च्या सेटवर रमजानच्या दिवसांमध्ये काय घडलं याचा किस्सा शेअर केलाय. विकी म्हणाला की, "प्रचंड गरमी होती. परंतु तरीही सिनेमाच्या सेटवर काही स्टंटमॅन असेही होते जे रोजा ठेऊन अॅक्शन सीन परफॉर्म करायचे. शूटिंग सुरु व्हायच्या आधी अनेक महिने आम्ही अॅक्शन सीनची ट्रेनिंग घेतली होती. आम्ही वाईत शूट करत असताना प्रचंड उन्हात तब्बल २ हजार लोकांसोबत आम्ही शूट करत होतो. त्यामध्ये ५०० स्टंटमॅन होते.""रमजानचा महिना तेव्हा सुरु होता. त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांची कहाणी दाखवताना कुठेही खंड पडू नये म्हणून अनेक स्टंटमॅन काहीही न खाता-पिता प्रचंड उन्हात शूटिंग करत होते." अशाप्रकारे विकीने 'छावा'च्या सेटवरील खास किस्सा सर्वांना सांगितला. 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारीला रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ६२७ कोटींची कमाई केली. 'छावा' सिनेमाच्या स्टारकास्टबद्दल सांगायचं तर या सिनेमात विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, विनित कुमार सिंग, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी या कलाकारांनी काम केलंय.