मोठ्या पडद्यावर 'छावा' (Chhaava) ची डरकाळी सर्वांनीच अनुभवली. सिनेमाने ८०० कोटींचा बिझनेस केला. विकी कौशलचे तर सगळेच चाहते झाले. अनेक आठवडे 'छावा'ने बॉक्सऑफिसवर राज्य केलं. मात्र ११ एप्रिल रोजी सिनेमा नेटफ्लिक्सवर आला आणि जोरदार आपटला. ओटीटीवर सिनेमा पाहायला प्रेक्षक फिरकतच नाहीयेत. इब्राहिम अली खानच्या 'नादानियां' या सुपरफ्लॉप सिनेमापेक्षाही 'छावा'ला कमी व्ह्यूज मिळाले आहेत.नेटफ्लिक्सच्या ७ ते १३ एप्रिलच्या आकड्यांनुसार, 'छावा'ने पहिल्या आठवड्यात ५.९ मिलियन व्ह्युइंग अव्हर्सनच्यानुसार २.२ मिलियन प्रेक्षकांची आकडा गाठला आहे. यासोबत नेटफ्लिक्सवर टॉप १० नॉन इंग्लिश सिनेमांच्या वर्ल्ड ट्रेंडिंग लिस्टमध्ये चौथं स्थान पटकावलं आहे. या आठवड्यात 'द डैड क्वेस्ट' पहिल्या क्रमांकावर आहे. 'आजाद' आणि 'इमर्जन्सी' नंतर विकी कौशलच्या सिनेमाने सर्वात कमी प्रदर्शन केलं आहे. कदाचित जवळपास सर्वांनीच सिनेमा थिएटरमध्ये बघितल्याने ओटीटीवर कोणीही बघायला आलं नाही असा अंदाज वर्तवला जात आहे.
२०२५ मधील ओटीटी रिलीज सिनेमाच्या पहिल्या आठवड्यातील व्ह्यूज पाहता 'धूम धाम' सिनेमा सर्वात पुढे आहे. या सिनेमाला ४.१ मिलियन व्ह्यूज मिळाले. दुसऱ्या स्थानावर इब्राहिम अली खानचा 'नादानियां' आहे ज्याला ३.९ मिलियन व्ह्यू आहेत. तर शाहीद कपूरचा 'देवा' २.८ मिलियन व्ह्यूजसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर 'छावा', 'इमर्जन्सी' आणि 'आजाद' क्रमाने आहेत.