उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच तिच्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असते. मध्यंतरी रिषभ पंतसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. मात्र हा सर्व उर्वशीचा पब्लिसिटी स्टंट होता. आता नुकतंच उर्वशीने लग्नावर भाष्य केलं आहे. तिने अजूनही लग्न का केलं नाही? याचं उत्तर देताना तिने पत्रिकेतील दोष असल्याचं म्हटलं आहे. नक्की काय म्हणाली उर्वशी वाचा.
इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत उर्वशी म्हणाली, "सध्या मी लग्न करु शकत नाही. कारण कटनी योग सुरु आहे. ज्या काळात कटनी योग सुरु असतो त्या काळात लग्न करु नये. हा योग अडीच वर्षांचा असतो. त्यामुळे अजून थोडा काळ राहिला आहे."
यासोबत उर्वशीने तिच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. जन्मपत्रिकेतील दोषामुळेच सध्या लग्न करणं योग्य नाही असं ती म्हणाली. यावरुन कमेंट्समध्ये सर्वांनी तिला ट्रोल केले. एकाने लिहिले, 'कटनी योग ला सामोरी जाणारी इतिहासातली पहिलीच महिला', 'कटनीनंतरही तुझं लग्न होणार नाही दीदी' अशा कमेंट्स आल्या आहेत.
30 वर्षीय उर्वशीने सनी देओलच्या 'सिंग साहब द ग्रेट' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती 'सनम रे','ग्रेट ग्रँड मस्ती' या सिनेमांमध्येही झळकली. नुकताच 'जेएनयू' सिनेमा रिलीज झाला. आता ती आगामी 'ब्लॅक रोज' या तेलुगु आणि 'दिल है ग्रे' या हिंदी सिनेमात दिसणार आहे.