Join us
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत बाजी मारलेल्या थलापती विजयच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:43 IST

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती सध्या त्याच्या राजकीय कारकीर्दीमुळे जास्त चर्चेत आहे. अशातच विजयच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळणार असल्याची दाट शक्यता आहे

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती सध्या त्याच्या राजकीय कारकीर्दीमुळे जास्त चर्चेत आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ मध्ये विजयचा 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) हा पक्ष मोठ्या बहुमताने विजयाकडे वाटचाल करताना दिसत असून, या पक्षाचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेल्या विजयला आणखी एक फायदा होणार आहे. ५ महिन्यांपासून रखडलेला विजयचा शेवटचा सिनेमा 'जन नायकन' लवकरच रिलीज होण्याची शक्यता आहे.  

विजय थलपतीचा शेवटचा चित्रपट 'जन नायकन'विजय थलपतीचा 'जन नायकन' (Jana Nayagan) हा राजकीय पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट गेल्या पाच महिन्यांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. हा चित्रपट विजयच्या अभिनय कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट मानला जात असल्याने चाहत्यांमध्ये याची प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) अद्याप या चित्रपटाला हिरवा कंदील मिळालेला नाही.

 'जन नायकन' हा चित्रपट ९ जानेवारी २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार होता. चित्रपट प्रदर्शनापूर्वी सेन्सॉर बोर्डाच्या समितीने याला परवानगी दिली होती, मात्र नवीन समिती स्थापन झाल्यानंतर या चित्रपटाच्या प्रमाणपत्रावर (Certificate) बंदी घालण्यात आली. चित्रपट निर्मात्यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले असले तरी, अद्याप कोणताही ठोस दिलासा मिळालेला नाही.

विजयानंतर प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होणार?तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय थलपतीच्या पक्षाने ज्या प्रकारे बाजी मारली आहे, ते पाहता सत्तेत आल्यानंतर 'जन नायकन' या चित्रपटाच्या प्रदर्शनातील अडथळे दूर होतील, असा अंदाज लावला जात आहे. चाहत्यांना यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार असली, तरी या राजकीय विजयामुळे 'जन नायकन' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे 'जन नायकन' आता रिलीज झाला तर विजयने निवडणुकीत जे यश संपादन केलंय त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचाही भरघोस प्रतिसाद मिळून चित्रपट कमाईचे विक्रम प्रस्थापित करेल यात शंका नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vijay's political win may clear path for delayed film release.

Web Summary : Superstar Vijay's political success in Tamil Nadu could pave the way for the release of his long-delayed film, 'Jana Nayagan'. The film, awaiting clearance, might benefit from his party's electoral gains, potentially leading to a successful theatrical run.
टॅग्स :थलापती विजयबॉलिवूडतामिळनाडूटेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी