Join us
Daily Top 2Weekly Top 5

यालाच म्हणतात खरं प्रेम! अमिताभ यांच्या प्रेमासाठी रेखा यांनी केलेला 'या' आवडत्या गोष्टीचा त्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 13:09 IST

रेखा आणि अमिताभ यांच्या प्रेमाचे अनेक किस्से सांगितले जातात. हा किस्साही अगदी तसाच

अभिनेत्री रेखा आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नात्याच्या चर्चा गेली अनेक वर्ष सुरु आहेत. रेखा यांचं अमिताभ बच्चन यांच्यावर खूप प्रेम होतं, हे आजही सांगितलं जातं. अशातच रेखा आणि अमिताभ यांच्या प्रेमाचा आणखी एक किस्सा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. जेव्हा अमिताभ यांच्यासाठी रेखा यांनी एका मोठ्या गोष्टीचा त्याग केला होता. काय होता तो किस्सा? जाणून घ्या.

अमिताभ यांच्या प्रेमासाठी रेखा यांनी सोडलेली ही गोष्ट

असं सांगण्यात येतं की, रेखा ज्यांना मांसाहार खूप आवडत होता, त्या केवळ अमिताभ बच्चन यांच्यासाठी शाकाहारी बनल्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, 'आपल्या प्रिय व्यक्तीसाठी तुम्ही काहीही करू शकता. जर तुम्हाला मांसाहार आवडत असेल, पण तुमचा प्रियकर शाकाहारी असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी सहजपणे मांसाहार सोडण्यास तयार होता. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता तो जर शुद्ध शाकाहारी असेल, तर तुम्हालाही त्याच्या जवळ जायचे असते. हे फक्त शारीरिक जवळिकीबद्दल नाही, तर तुम्हाला त्याच्या विचारांच्या जवळ जायचे असते. त्याच्यासाठी तुम्हाला त्याग करायचा असतो, ज्यामुळे तुम्ही त्याचं मन जिंकू शकता.'

आजही रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याची चर्चा अनेकदा होते. रेखा कळत - नकळतपणे अमिताभ बच्चन यांच्याबद्दल प्रेम दर्शवत असतात. इतकंच नव्हे रेखा या अमिताभ यांच्या प्रेमात इतक्या आकंठ बुडाल्या होत्या की, ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नात त्या भांगेत कुंकु लावून गेल्या होत्या. रेखा यांंचं तेव्हा लग्न झालं नव्हतं. त्यामुळे त्यांनी केलेली ही कृती सर्वांना आश्चर्य देऊन गेली.

टॅग्स :अमिताभ बच्चनरेखालग्नदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टबॉलिवूडरिलेशनशिप