Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकी कौशलच्या 'सॅम बहादूर' चित्रपटाचं नवीन पोस्टर आलं समोर; 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 11:56 IST

विकीचा 'सॅम बहादुर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. विकीचा 'सॅम बहादुर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातच या चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर आलं आहे. याच सोबत हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे याची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटामधील विकी कौशलचा लूक पाहायला मिळतोय. सिनेमाचे पोस्टर पाहून सॅम बहादुर सिनेमाविषयी उत्सुकता वाढली आहे.

'सॅम बहादूर'च्या पोस्टरमध्ये विकी कौशल भारतीय लष्कराच्या गणवेशात दिसत आहे. तो गाडीवर बसलेला असून त्याच्या हातात छडी आहे. तर त्यांच्या मागे  भारतीय जवान दिसत आहेत.  या पोस्टरवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षांव केलाय. १९७१ साली भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये मोठी कामगिरी केलेल्या फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांची गोष्ट या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. सॅम बहादुर चित्रपट १ डिसेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये येणार आहे.

सॅम बहादुर हा चित्रपट बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला आहे. अभिनेता विक्की कौशल सॅम मानेकशॉ यांच्या मुख्य भूमिकेत असून अभिनेत्री सान्या मल्होत्रा मानेकशॉ यांच्या पत्नी सिल्लू यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री फातिमा सना शेख माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. सिनेमाचं स्क्रिप्टींग गुलजार, भवनी अय्यर आणि शांतनु श्रीवास्वत यांनी केलं आहे.

टॅग्स :विकी कौशलबॉलिवूडसिनेमा