दाक्षिणात्य अभिनेता थलपति विजय सध्या घटस्फोटामुळे चांगलाच चर्चेत आहे. थलपति आणि त्याची पत्नी घटस्फोट घेणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. थलपतिच्या चाहत्यांना यामुळे चांगलाच धक्का बसला आहे. थलपतिचे एका अभिनेत्रीसोबतचे विवाहबाह्य संंबंध हे कारण यामागे सांगितलं जातंय. ज्या अभिनेत्रीसोबत थलपतिचं अफेअर आहे, तिच्याचसोबत थलपति एका रिसेप्शनमध्ये एकत्र दिसला. त्यामुळे थलपतिच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. कोण आहे ती?
थलपति आणि 'ती' एकत्रनिर्माते कलपति सुरेश यांच्या मुलाच्या थलपति विजयने हजेरी लावली. त्यावेळी थलपतिसोबत अभिनेत्री त्रिशा कृष्णन दिसून आली. थलपति आणि त्रिशा यांच्यात अफेअर सुरु असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. थलपतिच्या घटस्फोटाचं कारणही हेच मानलं जातंय. अशातच सर्व चर्चांना न जुमानता थलपति त्रिशासोबत या रिसेप्शनला पोहोचला. इतकंच नव्हे दोघांनी एकत्र फोटोशूटही केलं. या दोघांना एकत्र पाहताच सर्वजण थक्क झाले. थलपति आणि त्रिशाची जोडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.
Web Summary : Thalapathy Vijay's divorce rumors intensify amid alleged affair with actress Trisha Krishnan. The duo attended a reception together, sparking speculation. Their joint appearance and prior on-screen collaborations fuel the rumors of an extramarital relationship, reportedly the reason for Vijay's impending divorce after 27 years of marriage.
Web Summary : थलपति विजय के तलाक की अफवाहें अभिनेत्री त्रिशा कृष्णन के साथ कथित संबंधों के बीच तेज हो गईं। दोनों एक रिसेप्शन में एक साथ शामिल हुए, जिससे अटकलें तेज हो गईं। उनकी संयुक्त उपस्थिति और पहले के ऑन-स्क्रीन सहयोग ने विवाहेतर संबंध की अफवाहों को हवा दी, जो कथित तौर पर 27 साल की शादी के बाद विजय के आसन्न तलाक का कारण है।