Join us

योगिता चव्हाणने फॉलो केला 'अंगारों से' ट्रेंड; पती सौरभने केली भन्नाट कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 16:56 IST

Yogita chavan: 'अंगारो से' या गाण्यावर आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी रिल्स केले आहेत. यामध्येच आता या गाण्यावर ठेका धरायचा मोह अभिनेत्री योगिता चव्हाण हिलाही आवरला नाही.

एक काळ असा होता जेव्हा लोकांवर बॉलिवूड सिनेमांची क्रेझ होती. मात्र, गेल्या काही काळात हा ट्रेंड बदलला आहे. प्रेक्षकवर्गाचा कल दाक्षिणात्य सिनेमांकडे वळला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर बऱ्याचदा साऊथचे कलाकार वा त्यांच्या सिनेमातील गाणी यांची चर्चा होतांना दिसते. यात अलिकडेच 'पुष्पा 2' या सिनेमातील 'अंगारों से' हे गाण रिलीज झालं. विशेष म्हणजे हे गाणं सोशल मीडियावर गाजत असून अनेकांनी या गाण्यावर व्हिडीओ केले आहेत.

'अंगारो से' या गाण्यावर आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी रिल्स केले आहेत. यामध्येच आता या गाण्यावर ठेका धरायचा मोह अभिनेत्री योगिता चव्हाण हिलाही आवरला नाही. योगिताने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने अंगारो से या गाण्यावर जबरदस्त ताल धरला आहे.

दरम्यान, योगिताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तिच्या या व्हिडीओवर अभिनेता आणि तिचा पती सौरभ चौघुले यानेही प्रतिक्रिया दिली आहे. 'थॅक्स श्रीवल्ली' अशी कमेंट सौरभने केली आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारTollywood