Join us

लकी अलीच्या 'ओ सनम'वर स्वीटूचा मनमोहक डान्स; एक्स्प्रेशनमुळे जिंकली नेटकऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 13:30 IST

Anvita phaltankar: अभिनेत्री अन्विता फलटणकर 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून यापूर्वी तिने अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

ठळक मुद्देस्वीटूचे एक्स्प्रेशन्स पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

कमी कालावधीत तुफान लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'येऊ कशी तशी मी नांदायला'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे नलू, शकू, स्वीटू, ओम, मालविका या भूमिका साकारणारे प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आपल्यातलेच वाटतात. त्यातच ओम आणि स्वीटू हे दोघं तर अनेकांचं लाडक कपल आहे. म्हणूनच, या दोघांविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यातच स्वीटूने म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकरने नुकताच सोशल मीडियावर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

लोकप्रियतेचं शिखर गाठणारी अन्विता सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे अनेकदा ती तिचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.यावेळीदेखील तिने एक डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

'संस्कार विसरलीस का?' गणेश पूजेवेळी जाळीदार ड्रेस घातल्यामुळे कश्मिरा ट्रोल

स्वीटूने म्हणजेच अन्विताने लकी अली यांच्या ओ सनम या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावर असलेले भाव पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. त्यामुळेच स्वीटूचा हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आला आहे.

दरम्यान, अभिनेत्री अन्विता फलटणकर 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून यापूर्वी तिने अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'टाइमपास' या चित्रपटातही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे.  

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटीसिनेमा