'संस्कार विसरलीस का?' गणेश पूजेवेळी जाळीदार ड्रेस घातल्यामुळे कश्मिरा ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 12:22 PM2021-09-19T12:22:57+5:302021-09-19T12:24:13+5:30

Kashmera shah: कश्मिराच्या घरीदेखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. मात्र, गणपतीच्या पूजेच्यावेळी तिने परिधान केलेल्या स्टायलिश ड्रेसमुळे ती ट्रोल झाली आहे.

kashmera shah wore transparent kurta in ganesh puja | 'संस्कार विसरलीस का?' गणेश पूजेवेळी जाळीदार ड्रेस घातल्यामुळे कश्मिरा ट्रोल

'संस्कार विसरलीस का?' गणेश पूजेवेळी जाळीदार ड्रेस घातल्यामुळे कश्मिरा ट्रोल

googlenewsNext
ठळक मुद्देबॉलिवूडमधील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून कश्मिरा शाहकडे पाहिलं जातं.

गेल्या आठवडाभरापासून सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे.सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यामुळे सगळीकडे प्रसन्न आणि चैतन्याचं वातावरण आहे. बॉलिवूडमध्येही गणेशोत्सवाचा हा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांच्या बाप्पासोबतचे काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्येच कश्मिरा शाह (Kashmera Shah) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. चर्चेत आली म्हणण्यापेक्षा तिला ट्रोलिंगचा (Trolling) सामना करावा लागत आहे. कश्मिराने गणपतीच्या पुजेवेळी परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिच्यावर ट्रोलिंगची वेळ आली आहे.

बॉलिवूडमधील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून कश्मिरा शाहकडे पाहिलं जातं. मात्र, अनेकदा तिच्या या बोल्डनेसमुळेच ती अडचणीत येते. आतादेखील तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल व्हावं लागलं आहे. 
कश्मिराच्या घरीदेखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. मात्र, गणपतीच्या पूजेच्यावेळी तिने परिधान केलेल्या स्टायलिश ड्रेसमुळे ती ट्रोल झाली आहे. सोशल मीडियावर कश्मिराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कश्मिराने पूजेच्या वेळी ट्रान्सपरंट जाळीदार कुर्ता परिधान केला होता.

Bigg Boss15:१४ आठवड्यांसाठी सलमानने घेतलं इतकं मानधन; आकडा ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील

'निदान गणेश पूजा करताना तरी असे कपडे घालायचे नव्हतेस', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'पुजेच्या वेळी कसे कपडे घालावेत इतकही समजत नाही का?', असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. इतकंच नाही तर 'संस्कार विसरलीस का?', असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

Web Title: kashmera shah wore transparent kurta in ganesh puja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.