Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही मिस्टरसोबत फोटो पोस्ट का करत नाही? जान्हवी किल्लेकरला चाहतीचा प्रश्न, अभिनेत्री म्हणाली- "काही लोक त्याला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 11:52 IST

जान्हवीने तिच्या मुलासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोखाली एका चाहत्याने कमेंट तिच्या नवऱ्याबद्दल कमेंट केली. त्यावर जान्हवीने दिलेला रिप्लाय चर्चेत आहे.

अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही सर्वांची आवडती अभिनेत्री. जान्हवीला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. जान्हवी सोशल मीडियावर सक्रीय असते. जान्हवीचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून तिला एक मुलगाही आहे. अशातच जान्हवीने तिच्या मुलासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोखाली एका चाहत्याने कमेंट तिच्या नवऱ्याबद्दल कमेंट केली. त्यावर जान्हवीने दिलेला रिप्लाय चर्चेत आहे.

मिस्टरसोबत फोटो का नाही पोस्ट करत?

जान्हवीने स्विमिंगपूलमधले फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत ती मुलासोबत लडिवाळपणे फोटोशूट करत त्याच्यासोबत मजा-मस्ती करताना दिसतेय. या फोटोखाली जान्हवीच्या एका चाहतीने कमेंट केलीये की, ''मॅम तुम्ही तुमच्या मिस्टर सोबत कधीच फोटो पोस्ट का करत नाही?''.  चाहतीला रिप्लाय करताना जान्हवी म्हणाली, ''त्यांना नाही आवडत फोटो काढायला. कारण काही मूर्ख लोक त्याला ट्रोल करायला मोकळे असतात. त्यामुळे आम्ही टाळतो.'' अशापद्धतीने जान्हवीने चाहतीला नवऱ्यासोबतचे फोटो न टाकण्यामागचं कारण सांगितलं आहे.



जान्हवीबद्दल सांगायचं तर, गेल्या अनेक वर्षांपासून जान्हवी मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. जान्हवीला आपण विविध सिनेमा-मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. जान्हवीला खरी लोकप्रियता मिळाली ती बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमुळे. जान्हवीने तिच्या खास स्वभावाने हा सीझन चांगलाच गाजवला. सध्या जान्हवी विविध म्यूझिक व्हिडीओ आणि फोटोशूटच्या माध्यमातून सोशल मीडियावर चर्चेत असते. दरम्यान जान्हवीने दिलेला हा रिप्लाय खास चर्चेत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Why no photos with husband? Janhavi Killekar reveals reason.

Web Summary : Actress Janhavi Killekar explained why she doesn't post photos with her husband. She stated he avoids it due to potential trolling from insensitive people, protecting their privacy.
टॅग्स :बिग बॉस १९बिग बॉस मराठी ६टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेतासेलिब्रिटी