Join us
Daily Top 2Weekly Top 5

"दोन दिवसांपूर्वी ती मला भेटली होती तेव्हा..."; शेफाली जरीवालाच्या फिटनेस ट्रेनरने दिली मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:47 IST

शेफाली जरीवालाच्या फिटनेस ट्रेनरने अभिनेत्रीच्या रुटिनबद्दल मोठी माहिती सांगितली. याशिवाय त्याने शेफालीच्या दिनचर्येबद्दल मोठा खुलासा केला

बिग बॉस मधील प्रसिद्ध स्पर्धक शेफाली जरीवालाचं निधन झाल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केलीय. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी शेफालीने अखेरचा श्वास घेतला. शेफालीच्या अकस्मात एक्झिट अनेकांना चटका लावणारी ठरली. शेफालीचे चाहते, इंडस्ट्रीतील तिचे सहकलाकार अशा अनेकांनी शेफालीच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. अशातच शेफालीच्या निधनानंतर तिच्या फिटनेस ट्रेनरने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. शेफालीचं फिटनेस रुटिन कसं होतं? याविषयी तो काय म्हणाला बघा

शेफाली जरीवालाचं फिटनेस रुटिन कसं होतं?

शेफालीला श्रद्धांजली देण्यासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये तिचे निकटवर्तीय उपस्थित होते. यामध्ये तिचा फिटनेस ट्रेनरही सहभागी होता. शेफालीच्या फिटनेस ट्रेनरने सांगितलं की, "स्वतःच्या आरोग्याविषयी शेफाली खूप शिस्तप्रिय होती. ती अत्यंत कडक असं डाएट घ्यायची याशिवाय नियमित व्यायाम करायची. दोन दिवसांआधीच तिच्याशी माझी भेट झाली. तिला वारंवार फिट यायची त्यामुळे त्यावर नियंत्रण  मिळवण्यासाठी ती कायम थंड पेय आणि थंड पदार्थ खाणं टाळायची. ती अत्यंत शिस्तबद्ध दिनचर्या पालन करुन स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यायची."

शेफालीची शेवटची पोस्ट

शेफाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय होती. ती विविध फोटोशूट आणि पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचं लक्ष वेधून घ्यायची. अशातच शेफालीची काही दिवसांपूर्वींची पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये शेफाली मेकअप करताना दिसून येते. हा व्हिडीओ शेअर करुन शेफाली लिहिलं होतं की, 'आयुष्य आनंदाने जगण्याची वेळ आली आहे. सर्व काही आपल्या मनासारखं घडतंय, असं वाटतंय.' असं कॅप्शन देत शेफालीने हा व्हिडीओ शेअर केला होता. इतकंच नव्हे त्यानंतर काही दिवसांपूर्वी शेफालीने ग्लॅमरस फोटोशूट करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

टॅग्स :शेफाली जरीवालामृत्यूटिव्ही कलाकारहृदयविकाराचा झटकाबिग बॉस