Join us

लग्नानंतर अंकिता वालावलकरची पहिली वटपौर्णिमा! कोकण हार्टेड गर्लसाठी नवऱ्याने केला उपवास, म्हणाली- "नवरोबा..."

By कोमल खांबे | Updated: June 10, 2025 11:52 IST

कोकण हार्टेड गर्ल आणि बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकरची लग्नानंतरची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे. अंकिताने नवऱ्यासोबत वटपौर्णिमेचा सण साजरा केला. विशेष म्हणजे अंकितासोबत कुणालनेही तिच्यासाठी उपवास केला होता. 

आज सर्वत्र वटपौर्णिमेचा सण साजरा केला जात आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत केले जाते. आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यवती हे व्रत करतात. दरवर्षी अनेक अभिनेत्रीही वटसावित्रीचं व्रत करत वटपौर्णिमा साजरी करतात. कोकण हार्टेड गर्ल आणि बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकरची लग्नानंतरची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे. अंकिताने नवऱ्यासोबत वटपौर्णिमेचा सण साजरा केला. विशेष म्हणजे अंकितासोबत कुणालनेही तिच्यासाठी उपवास केला होता. 

अंकिताने वटपौर्णिमेचा उपवास करत वडाच्या झाडाची पूजा केली. यासाठी अंकिताने पारंपरिक लूक केला होता. तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. केसांचा बन बांधून आणि मंगळसूत्र, ज्वेलरी घालत तिने मराठमोळा लूक केला होता. लग्नानंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेचा व्हिडिओ अंकिताने शेअर केला आहे. "नवरोबा आज माझ्यासोबत तुझाही उपवास आहे… छान वाटलं मला..खात्री आहे हे सगळं आयुष्यभर निभावशील…वटपौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!", असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे. 

अंकिता आणि कुणाल भगतने फेब्रुवारी महिन्यात कोकणात लग्नगाठ बांधली.  सिंधुदुर्ग वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात अंकिता-कुणालने कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सात फेरे घेतले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कुणाल हा पेशाने गायक आणि संगीतकार आहे. काही दिवसांपूर्वीच ते पॅरिसला फिरायला गेले होते. 

टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरटिव्ही कलाकारवटपौर्णिमा