Join us

"माझा वेडा पोरगा...", वनिता खरातच्या वाढदिवशी नम्रताची मजेशीर पोस्ट, शेअर केला सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:20 IST

विनोद बुद्धी आणि अभिनयाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या वनिताचा आज वाढदिवस आहे. वनिताच्या वाढदिवशी अभिनेत्री नम्रता संभेरावने तिच्यासाठी खास पोस्ट केली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील अतिशय लाडका आणि लोकप्रिय कॉमेडी शो. याच शोने अनेक नवोदित कलाकारांना ओळख मिळवून दिली. वनिता खरातलाही हास्यजत्रेमुळेच टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत वनिताने सिनेसृष्टीत नाव कमावलं. विनोद बुद्धी आणि अभिनयाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या वनिताचा आज वाढदिवस आहे. वनिताच्या वाढदिवशी अभिनेत्री नम्रता संभेरावने तिच्यासाठी खास पोस्ट केली आहे. 

नम्रताने तिच्या सोशल मीडियावरुन वनितासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्या दोघींनीही काळी जीन्स आणि लाल रंगाच्या टॉपमध्ये ट्विनिंग केल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत नम्रता म्हणते, "'ट्विनिंग विथ माझा येडा पोरगा ♥️ हॅपी बर्थडे वनिता...अशीच हसत रहा खुश रहा खूप डेंजर कमाल अभिनेत्री आहेस तू . आणि तुझी सगळी स्वप्न लवकर पूर्ण होणार आहेत". नम्रताच्या या पोस्टवर वनिताच्या चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. 

वनिता खरात शाहीद कपूरच्या कबिर सिंग सिनेमामुळेही चर्चेत आली होती. या सिनेमातील तिचा एक सीन प्रचंड व्हायरल झाला होता. काही मराठी सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. 'एकदा येऊन तर बघा', 'गुलकंद', 'चिकी चिकी बुम बुम बुम', 'सरला एक कोटी', 'फुलवंती' अशा सिनेमांमध्ये ती झळकली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'येरे येरे पैसा ३'मध्येही वनिताची महत्त्वाची भूमिका आहे. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रावनिता खरातटिव्ही कलाकारनम्रता आवटे संभेराव