Join us

कार्तिकीने दीपिकाशी तोडलेल्या मैत्रीचं सत्य दिपाला कळणार; दिपा घेणार महत्त्वाचा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 17:51 IST

Rang Majha Vegla: गेल्या काही दिवसांपासून कार्तिकीने दीपिकाशी बोलणं का बंद केलंय?  असा प्रश्न दिपा तिला विचारते. यावेळी कार्तिकी सगळं सत्य सांगणार आहे.

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'रंग माझा वेगळा' (Rang Majha Vegla). गेल्या कित्येक वर्षांपासून विभक्त राहत असलेली दिपा आणि कार्तिक त्यांच्या मुलींमुळे एकत्र येताना दिसत आहे. यात कार्तिकी आणि दीपिका यांच्यातील मैत्री दिवसेंदिवस वाढत असतानाच या मैत्रीत श्वेता आणि आयशामुळे मीठाचा खडा पडणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कार्तिकी, दीपिकासोबत फारशी नीट वागत नसल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, ती असं का वागते यामागचं सत्य दिपासमोर येणार आहे.

सोशल मीडियावर सध्या या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दीपिका कायमस्वरुपी अमेरिकेला रहायला जाणार असल्याचं सांगते. तसंच इथे माझं कोणीच बेस्टफ्रेंड नाही असंही सांगते. दीपिकाचं हे बोलणं ऐकल्यावर कार्तिकी रडू लागते आणि घरी येऊन सगळा प्रकार दिपाला सांगते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कार्तिकीने दीपिकाशी बोलणं का बंद केलंय?  असा प्रश्न दिपा तिला विचारते. यावर श्वेता आणि आयशा या दोघींनीच दीपिकासोबतची मैत्री तोड असं सांगितल्याचं सत्य कार्तिकी सांगते. त्यामुळे आता आयशा आणि श्वेताचा प्लॅन समजल्यानंतर दिपा कोणता निर्णय घेणार कार्तिकी-दीपिकाची मैत्री पुन्हा होणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकाररेश्मा शिंदे