Join us

'मी कधीच तुझा विश्वासघात केला नाही'; दिपा-कार्तिकमधील गैरसमज होणार दूर; मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 17:42 IST

Rang maza vegla : सध्या या मालिकेत दिपा आणि कार्तिक यांच्या मुलींची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे दिपिका आणि कार्तिकी या दोघींमुळे पुन्हा एक नवं वळण या मालिकेला मिळालं आहे.

'रंग माझा वेगळा' (rang maza vegla) या मालिकेत आतापर्यंत अनेक रंगतदार वळणं आली. दिपा-कार्तिकच्या नात्यातील प्रेम, सौंदर्याने केलेला दिपाचा तिरस्कार आणि त्यानंतर दिपा-कार्तिकच्या नात्यात आलेला दुरावा या सगळ्यामुळेही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेत दिपा आणि कार्तिक यांच्या मुलींची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे दिपिका आणि कार्तिकी या दोघींमुळे पुन्हा एक नवं वळण या मालिकेला मिळालं आहे. या दोघींमुळेच कार्तिक आणि दिपा पुन्हा एकत्र येताना दिसत आहे.  इतकंच नाही तर आता या दोघांमधील गैरसमजदेखील दूर होणार आहे.

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिपा आणि कार्तिक इतक्या वर्षांमध्ये दोघांच्या आयुष्यात नेमके कसे बदल झाले यावर चर्चा करणार आहेत. इतकंच नाही तर या चर्चांमधून त्यांच्यातील मतभेद, गैरसमजदेखील दूर होणार आहेत.

दरम्यान, कार्तिकी आणि दिपिकाच्या शाळेच्या पिकनिकवरुन पुन्हा घरी येताना कार्तिकची गाडी बंद पडते. त्यामुळे या चौघांना वाटेतच एका घरात राहावं लागतं. इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच दिपा-कार्तिक एकत्र राहत आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या दोन्ही लेकीदेखील त्यांच्यासोबत आहे. त्यामुळेच आता दिपा-कार्तिकचा मोडलेला संसार पुन्हा उभा राहिल का? या चौघांचं चौकटी कुटुंब एकत्र येईल का? असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.  

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकाररेश्मा शिंदे