Join us

आत्महत्याच्या एक दिवस आधी तुनिषा आणि शिजानमध्ये झालं होतं जोरदार भांडण, पोलिसांच्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 18:52 IST

तुनिषाने आत्महत्या करण्यापूर्वी तिचा सेटवर शीजान खानसोबत वाद झाला होता.

Tunisha Sharma Suicide Case: तुनिषा आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. याप्रकरणी पोलिस शीजान खानची सतत चौकशी करत आहेत. आता वालीव पोलिसांनी सांगितले की, तुनिषाने आत्महत्या करण्यापूर्वी तिचा सेटवर शीजान खानसोबत वाद झाला होता. यादरम्यान सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.

तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी शिजान खानवर गंभीर आरोप केले आहेत. वनिता यांनी शिजानवर तुनिषाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तुनिषाच्या आईने खुलासा केला की, ब्रेकअपच्या दिवशी शिजानने तुनिषाला थप्पड मारली होती. 

या प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात खळबळजनक दावा तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी केला आहे. त्यांनी शिजान खानवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप केला आहे. वनिता शर्मा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, शिजान खान ड्रग्ज सेवन करायचा. मात्र, तो अमली पदार्थ कधीपासून घेत होता, याची माहिती नाही. एवढेच नाही तर तुनिशाचे मामा पवन शर्माप्रमाणेच आता आईनेही शिजानला भेटल्यानंतर तुनिषाची जीवनशैली बदलल्याचे सांगितले आहे. तिने हिजाब घालायला सुरुवात केली होती आणि शिजान तिला उर्दू शिकवत होता. मुलीच्या मृत्यूनंतर शिजानने तिला मदत केली नाही.

वनिता शर्माने यापूर्वीही शिजानवर अनेक मुलींशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. शिजानच्या व्हॉट्सअॅप चॅट्समधून पोलिसांना त्याच्या सिक्रेट गर्लफ्रेंडची माहिती मिळाली. आता पोलिसांनी या मैत्रिणीचीही चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ही गर्लफ्रेंड कोण आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, शनिवारी साडेतीन वाजता तुनिषाने तिच्या मेकअप रूममध्ये पंख्याला गळफास लावून घेतला, त्याच्या जवळपास २ तास आधी शिजानने सिक्रेट गर्लफ्रेंडशी बोलला होता.

टॅग्स :टिव्ही कलाकारमृत्यूगुन्हेगारी