Join us

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने खरेदी केलं नवं घर; सामान शिफ्टिंगचा व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 12:44 IST

Amit bhanushali: अमितने त्याच्या युट्यूब चॅनेलवर त्याच्या नव्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे.

छोट्या पडद्यावर सध्या 'ठरलं तर मग' ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. उत्तम कथानकासह कलाकारांचा अभिनय यांमुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अमित भानुशाली (amit bhanushali) याची तर तरुणींमध्ये विशेष क्रेझ आहे. कलाविश्वात सक्रीय असलेला अमित सोशल मीडियावरही तितकाच अॅक्टीव्ह असून नुकतंच त्याने त्याचं नवीन घर खरेदी केलं आहे.

अमितचं युट्यूब चॅनेल असून या चॅनेलवर त्याने त्याच्या नव्या घराची माहिती चाहत्यांना दिली. सोबतच त्याने घरातील शिफ्टिंग कशाप्रकारे सुरु आहे हे सुद्धा या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवलं.अमितने अद्याप तरी त्याच्या नव्या घराची झलक दाखवली नसली तरी सुद्धा लवकरच तो त्याच्याही व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करणार आहे.

अमितने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो जुन्या घरातलं सामान नव्या घरात शिफ्ट करताना दिसत आहे. “नव्या घरात आपलं संपूर्ण सामान शिफ्ट करताना खरंच खूप तारेवरची कसरत होते. पण, हा सगळा ताण असताना माझ्या लेकाचं म्हणजेच हृदानचं एक हास्य पाहून मन प्रसन्न होतं. त्याच्यामुळे आमच्यामध्ये एक नवीन उर्जा निर्माण होते. लवकरच आम्ही नव्या घरात शिफ्ट होऊ. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच आमच्या कुटुंबाच्या कायम पाठीशी ठेवा. सगळ्यांना भरभरून प्रेम!” , असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, अमितने सामान शिफ्टिंगचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आता चाहते त्याच्या घराची झलक पाहण्यासाठी कमालीचे उत्सुक झाले आहेत. सोबतच अनेक जण त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेतासुंदर गृहनियोजनसेलिब्रिटी