Join us
Daily Top 2Weekly Top 5

'इतरांसारखं सुंदर...', अभिनेत्री तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत; चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 12:30 IST

टीव्हीवरील जान्हवी नावाने लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान बऱ्याच काळापासून पडद्यावरुन गायब आहे.

Tejashree Pradhan : टीव्हीवरील जान्हवी नावाने लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान बऱ्याच काळापासून पडद्यावरुन गायब आहे. मात्र अनेकदा ती सोशल मीडियावर एखादा फोटो पोस्ट करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकताच तिने एक फोटो पोस्ट केला असून त्याला लक्षवेधी कॅप्शनही दिलं आहे.

'होणार सून मी या घरची' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधानची चाहते आठवण काढत असतात. ती सध्या काय करते असाच प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. मोकळे केस, थोडा मेकअप अशा लुकमध्ये  ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिले, 'हॅलो ब्युटिफुल, दुसऱ्यांसारखं सुंदर बनायला जाऊ नको, स्वत:सारखंच सुंदर हो. #HappyLife

तेजश्रीने मराठी नाटक, सिनेमा आणि मालिका अशा प्रत्येक माध्यमात काम करुन अभिनयाची छाप पाडली आहे. तिच्या प्रत्येक भूमिका या वेगवेगळ्या ठरल्या आहेत. यामुळे चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागली आहे. सध्या ती सोशल मीडियावरुनच चाहत्यांच्या संपर्कात आहे.

टॅग्स :तेजश्री प्रधान टेलिव्हिजनटिव्ही कलाकारइन्स्टाग्राम